शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तांवर मेहेरबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:04 IST

वर्षभरापूर्वी अधिकारशून्य करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे नव्याने नऊ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेले ५ लाखांपर्यंतचे वित्तीय अधिकार कमी करून त्यांना ३ लाख रूपयांच्या स्वाक्षरीचे धनी करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन लाखांचे अधिकार : नऊ विभागांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापूर्वी अधिकारशून्य करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे नव्याने नऊ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेले ५ लाखांपर्यंतचे वित्तीय अधिकार कमी करून त्यांना ३ लाख रूपयांच्या स्वाक्षरीचे धनी करण्यात आले आहे. तब्बल वर्षभरानंतर प्रशासनप्रमुखांनी अतिरिक्त आयुक्तांवर दाखविलेली मेहेरबानी सर्वार्थाने चर्चेची बाब ठरली आहे. २१ एप्रिल २०१८ रोजी पारित आदेशातील नमूद बाबींची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासही अतिरिक्त आयुक्तांना बजावण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे १३ विभागांसह ५ लाख रूपयांपर्यंतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र, स्वच्छता, पाणीपुरवठा, पशूशल्य व शिक्षण विभागाबाबत तक्रारी आल्याने शेटे यांच्याकडून या चार विभागासह वित्तीय अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे शेटे हे वर्षभरापासून फुलपगारी बिन अधिकारी बनले होते. शेटे यांच्याकडे महत्त्वपूर्ण विभाग नसल्याने मागील सहा महिन्यांत तर त्यांची छबी केवळ चौकशी अधिकारी म्हणून मर्यादित झाली होती. त्यांच्याविरूद्ध दोन विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्या. मात्र, २३ मे रोजी अचानक शेटे यांना काही विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये २ वर्षे पूर्ण करणाऱ्या शेटेंना बदलीचे वेध लागले आहेत. त्यामुळे उशिरा मिळालेल्या जबाबदारीचे वहन ते खरेच मनापासून करतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.स्वच्छता का नाही?स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शेटे यांनी भरीव कार्य केले. वैयक्तिक शौचालयाची योजना त्यांच्या अ‍ॅक्टिव्हनेसमुळे यशस्वी झाली. त्यामुळे विभाग नसतानाही व्यापक कार्य करणाºया शेटेंकडे स्वच्छता विभागाची जबाबदारी का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या विभागाची नव्याने जबाबदारीसांख्यिकी जनगणना, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण व क्रीडा विभाग, पशूसंवर्धन व कोंडवाडा विभाग, पाणीपुरवठा, पर्यावरण, समाजविकास व दलितवस्ती सुधारणा एप्रिल १७ मध्ये परत घेतलेल्या चार विभागांपैकी स्वच्छता वगळता अन्य तीन विभाग शेटेंना नव्याने बहाल करण्यात आले आहेत.