शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रवेशात अडसर

By admin | Updated: June 19, 2017 00:17 IST

कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या ...

भारनियमनाचा त्रास : महावितरणचा मनमानी कारभार लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे. सद्यस्थितीत शहरातील शेकडो विद्यार्थी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करीत असून, बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे तंत्र व उच्चशिक्षणाची प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यंदापासून अकरावीची प्रवेशप्रक्रियाही आॅनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यात अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना विजेचा लपंडाव सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी इन्व्हर्टर तथा जनरेटरचा वापर होत असला तरी अशी व्यवस्था नसलेल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांचे हात होत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका भारनियमनाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आॅनलाईन अर्ज सादर करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना सततच्या भारनियमनामुळे प्रवेशाचे अर्ज सादर करणे कठीण झाले आहे. काही दिवसांपासून शहरी भागातील महावितरणने अघोषित भारनियमन लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांसह सायबर कॅफेचे संचालक हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या भरवशावर आॅनलाईन सेंटर चालविणाऱ्या संचालकांना हल्ली अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. इयत्ता अकरावी, बारावी, अभियांत्रिकी, फॉर्मसी, पदवी परीक्षांचे प्रवेशपत्र आॅनलाईन सादर करावे लागत आहे. मात्र विजेअभावी आॅनलाईन प्रक्रिया ठप्प राहत असल्याने सायबर कॅफे सेंटरवर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ही नित्याचीच बाब झाली आहे. निश्चित कालावधीत आॅनलाईन प्रवेशपत्र सादर करावयाचे असल्याने विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.