शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटिंगच्या नावावर मुलींना फसविणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: March 22, 2016 00:29 IST

विविध वस्तू थेट मार्केटिंगव्दारे विकल्या जातात. त्या वस्तू किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना घरपोहच दिल्या जातात.

सावधान : वसुली प्रतिनिधी तुम्हालाही फसवू शकतोवरूड : विविध वस्तू थेट मार्केटिंगव्दारे विकल्या जातात. त्या वस्तू किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना घरपोहच दिल्या जातात. यामध्ये हप्तेवारीने वसुली करण्यासाठी युवा प्रतिनिधीची नियुक्ती करून वसुली होते. परंतु कंपनीचे प्रतिनिधी घरी जाऊन त्या घरातील मुलींना लक्ष्य करतात. दुपारच्यावेळी घरी कुणी नसताना युवतींना प्रेम जाळ्यात फसविण्याचे प्रकार सुरू आहे. अशाच एका मार्केटिंग प्रतिनिधीच्या घरी ग्रामीण भागातील युवती सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती.स्पर्धेच्या युगात विविध कंपन्यांनी आपल्या वस्तू थेट मार्केटिंगव्दारे ग्राहकांना घरपोच विकण्याचा फंडा सुरू केला. याकरिता विक्री प्रतिनिधीची आकर्षक मानधन आणि कमिशनवर नियुक्ती करून घरोघरी पाठविण्यात येऊन किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना विकण्यात येते. किस्तवारीची रक्कम वसुलीसाठी सदर प्रतिनिधी आठवड्यातून एक दिवस ग्राहकाकडे जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक असल्याने घरपोेच वस्तू मिळत असेल तर कुणीही खरेदी करतो. ठरलेल्या तारखेनुसार किस्तीची रक्कम घरी ठेवून आपल्या कामधंदयाला शेतावर निघून जातात. दुपारच्या वेळी घरी केवळ मुलेबाळे असतात. यामध्ये तरुणीसुध्दा घरात असल्याने सदर वसुली प्रतिनिधी हे दुपारच्या वेळी घरी जाऊन युवतींना फसविण्याचे षड्यंत्र रचतात. प्रलोभने दाखवून प्रेमजाळ्यात अडकविण्याचे प्रकार घडत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार तीन दिवसांपूर्वी एका परिसरात उघडकीस आला असून कंपनीचे विक्रीप्रतिनीधी असलेल्याच्या खोलीत ग्रामीण भागातील दोन तरुणी काही सतर्क नागरिकांना आढळून आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु पोलिसांपुढे युवतीच्या पालकांनी समस्या निर्माण करून तक्रारीच्या भानगडीत पडायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे. अखेर त्या तरुणांना नाईलाजाने सोडून देण्यात आले. परंंतु ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सतर्कराहण्याची सूचना देण्याची वेळ आली आहे. (तालुका प्रतिनिधी)भामट्यांना शिकविणार युवासेना धडातालुक्यात कुठेही ग्रामीण व शहरी भागातील तरुणींना प्रलोभने दाखवून फसविण्याचे प्रकार सुरु आहे. युवा सेनेच्या वतीने अशा भामट्यांना धडा शिकविण्यात येईल. असाच प्रकार तालुक्यात कुठेही दिसल्यास तात्काळ पोलीस व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्कसाधावा, असे आवाहन युवा सेनेचे तालुकाध्यक्ष मदन झळके यांनी केले आहे.