लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पांढुर्णा व नागपूर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अडसर ठरणारे १ हजार १९० वृक्ष कापली जाणार आहेत. यासंदर्भात वनविभागाकडून करण्यात येणारा डोळझाकपणा चव्हाट्यावर आणला. यामुळे वनविभागाने कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. झाडांच्या कटाईवर वनविभागाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.झाडांची कत्तल व वाहतूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर वनविभाग खडबडून जागा झाला आणि वृक्ष कटाई करणाºयाविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. पांढुर्णा व नागपूर मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात येत आहे. या कामात अडसर ठरणारी शेकडो वर्षे जुनी मोठी वड, पिंपळ, आंबा, निंबासह आडजातीचे वृक्ष आहे.वृक्षतोडीनंतर लागणारी टी.पी.मात्र अद्यापही काढलेली नसल्याचे वनाधिकारी दादाराव काळे यांनी सांगितले. यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत, असेही ते म्हणाले.वडाची सावली हरवणाररस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात ३०० वर्षे जुणे वडाच्या झाडावर आरा चालविण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी ऊन, वारा, पावसापासून सरंक्षण करणारे वडाचे झाड अनेकांसाठी प्रवासात विश्रामाचे महत्त्वाचे स्थान ठरत होते. आता मात्र वडाच्या सवालीला नागरिक मुकणार असल्याची चर्चा आहे.
वृक्ष तोडीवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:05 IST
पांढुर्णा व नागपूर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अडसर ठरणारे १ हजार १९० वृक्ष कापली जाणार आहेत. यासंदर्भात वनविभागाकडून करण्यात येणारा डोळझाकपणा चव्हाट्यावर आणला.
वृक्ष तोडीवर होणार कारवाई
ठळक मुद्देवनविभाग सज्ज : ३०० वर्षांच्या वृक्षाची कत्तल