शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

निवासी क्षेत्रातील वाणिज्य वापरावर होणार कारवाई

By admin | Updated: July 24, 2015 00:18 IST

निवासी क्षेत्रातील इमारतींचा वाणिज्य वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

दुप्पट कर, दंड वसुली : ३१ आॅगस्टपर्यंत नियमित करुन घेण्याचे आवाहनअमरावती : निवासी क्षेत्रातील इमारतींचा वाणिज्य वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावून वाणिज्य वापर केल्याप्रकरणी दुप्पट कर आणि दंड वसूल करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत ही संधी असून त्यानंतर वाणिज्य वापर करणाऱ्यांवर महापालिका अधिनियमानुसार कारवाई होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.नवीन व अतिरिक्त बांधकामांची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कर आकारणीचा मुद्दा शमत नाही तोच निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करणाऱ्या मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. पाचही झोनमध्ये अशा मालमत्ता शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिले आहेत.पत्रकांचे वाटप करून ध्वनीक्षेपकाद्वारे देणार माहिती निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांनी मुंबई महापालिका अधिनियमानुसार नियमित कार्यवाही करून घेण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पत्रकांचे वाटप केले जाईल. ध्वनीक्षेपकावरून दुप्पट कर आणि दंडात्मक रक्कम भरण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील. ३१ आॅगस्टपर्यंत ही संधी राहणार असून त्यानंतर प्रशासन नियमानुसार कारवाई करणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.अमरावतीचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी उत्पन्नात वाढ करावी लागेल. त्यामुळे आता निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करून व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.