खटेकार, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख अजय वन सेले, योगेश कोसे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
---------------
पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन
अमरावती : शहरातील न्यू कॉटन मार्केट सहकारनगर चौक ते पाठ्यपुस्तकालयापर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम होत आहे. या रस्त्याची डावी बाजू १५ जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे. अमरावती-अचलपूर राज्य मार्गाची सुधारणाही होत आहे. त्यामुळे शहरातील उजवी बाजू वाहतुकीस बंद राहील.
---------------------
अत्यावश्यक सेवेत चष्म्याची दुकाने, सीए कार्यालयांना मुभा
अमरावती : चष्म्याची तसेच श्रवणयंत्राची दुकाने व सनदी लेखापालांची कार्यालये संचारबंदीच्या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहू शकतील, असा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. शहरात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.