शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदानाच्या टक्केवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:36 IST

लोकसभा निवडणुकीत हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता किमान ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, अशी तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने चालविली आहे. त्यानुसार विविध उपक्रम, कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे. याच धर्तीवर दिव्यांगांचे मतदान टक्केवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण देण्याचा कृती कार्यक्रम आखला जात आहे.

ठळक मुद्देईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण : शाळा - महाविद्यालयांत विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता किमान ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, अशी तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने चालविली आहे. त्यानुसार विविध उपक्रम, कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे. याच धर्तीवर दिव्यांगांचे मतदान टक्केवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण देण्याचा कृती कार्यक्रम आखला जात आहे.मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदानाच्या टक्केवाढीकडे अधिक लक्ष दिले आहे. विशेषत: महिला, युवा मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी १८ एप्रिल रोजी अपंग विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रेरित करण्याकरिता शाळा, महाविद्यालयांत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहे. दिव्यांग मतदार सेलचे प्रमुख सुनील वारे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. महानगरातील दिव्यांगांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. दिव्यांगांचा मतदार नोंदणी ते मतदान प्रक्रियेत सहभाग असा प्रवास निवडणूक विभागाकडून सुरू आहे.दोन दिवस प्रशिक्षणनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नियोजनानुसार २८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजता मार्डी मार्गावरील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था आणि वडाळी कॅम्प येथील आश्रित अंध कर्मशाळेत दुपारी १ ते ३ या दरम्यान तर, दुपारी ४ ते ६ वाजता दरम्यान फरशी स्टॉप येथील प्रयास मतीमंद विद्यालयात दिव्यांगांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रहाटगाव येथील वसंतराव नाईक अपंग कर्मशाळा येथे तर, दुपारी १ वाजता साईनगर येथील बुलीदान राठी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळ अधिकारी, तलाठी हे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देतील.सामान्य मतदारांप्रमाणे दिव्यांग मतदारही निवडणूक प्रक्रियेतून मागे राहू नये, यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहे. यातील पहिला टप्पा दिव्यांगांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रशिक्षणाचा असणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची मतदानात टक्केवारी वाढणार आहे.- सुनील वारे, प्रमुख, दिव्यांग मतदार सेल, अमरावती