शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बडनेरा हॉटस्पॉटसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आहेत. त्या व्यक्तींनी समोर येऊन आरोग्य तपासणी व सूचनांप्रमाणे क्वारंटाईन राहण्यासाठी आता लक्ष देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएकूण ४५, जिल्ह्यात सर्वात जास्त : जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांमध्ये चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या बडनेरामध्ये कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आता नवा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यात बुधवारी याविषयी चर्चा झाली. येथे आतापर्यंत ४५ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या याच भागात असल्याने कोरोनाची साखळी ‘बे्रक’ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे.सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आहेत. त्या व्यक्तींनी समोर येऊन आरोग्य तपासणी व सूचनांप्रमाणे क्वारंटाईन राहण्यासाठी आता लक्ष देण्यात येणार आहे.नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय आवागमनास बंदी घालण्यात आली आहे. या सर्व कंटेनमेंटमध्ये आशा व एएनएम यांच्या पथकांकडून सर्वे सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, मधुमेहसह अन्य आजार आहे का, कुठल्या आजाराची लक्षणे आहेत का, औषधे घेतली जात आहेत का, याविषयीदेखील विचारणा करण्यात येईल. त्याबाबत नोंद ठेवली जाणार असल्याचे असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. बरेच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने, काही लक्षणे आढळताच तातडीने स्वॅब घेण्यात येऊन उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.महापालिका आयुक्तांसोबत याविषयी चर्चा झालेली आहे. पुन्हा बुधवारी सायंकाळी चर्चा करण्यात येणार आहे. येथील नागरिक व पदाधिकारी कोरोनाला पळवून लावण्याविषयी सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.जनता कर्फ्यूची नगरसेवकांद्वारे मागणीलॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बडनेरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेला आहे. अंत्यत दाट लोकवस्ती असणाऱ्या या नगरासाठी ही गंभीर बाब आहे. येथील अधिकांश भाग हा झोपडपट्टीचा असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बडनेरात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू सक्तीने करण्याची मागणी येथील सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली. नागरिकांचीदेखील ही मागणी आहे. यावेळी नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंझाड, इमरान सईद, इशरत बानो मन्नान खाँ, गंगा अंभोरे, मोहम्मद साबीर, रुबिना तबस्सुम हारून अली आदी उपस्थित होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या