शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसात वीजबिल थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ ...

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय जुलै महिन्यात पहिल्या २२ दिवसांत ३७८ कोटींच्या उद्दिष्ठांपैकी ७७ कोटीच वसूल झाले. येत्या नऊ दिवसात किमान ८३.५४ कोटींच्या वसूलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे थेट निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी शुक्रवारी दिले. महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, भविष्यात थकबाकीदार ग्राहकांना उधारित वीज देणे महावितरणला शक्य नसल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून शंभर टक्के थकबाकी वसुलीचे निर्देश रंगारी यांनी दिले. महावितरणच्या विद्युत भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, उपमहाव्यवस्थापक (वित्त वे लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, भारतभूषण औगड, अनिरूध्द आलेगावकर, दीपक अघाव यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

राज्यातील वीजग्राहकांकडे ७२ हजार कोटींच्या घरात थकबाकी असताना महावितरणला ग्राहकाची विजेची गरज भागविण्यासाठी हजारो कोटींचे कर्ज काढावे लागत आहे. याचा परिणाम येत्या काळात वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही प्रादेशिक संचालक म्हणाले.

जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील ५ लाख ५० हजार वीज ग्राहकांकडून जुलै महिन्यात ३७८ कोटी वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आली. त्यापैकी २२ दिवसात केवळ १६.४६ टक्केच वसुली झाली आहे. त्यामुळे पुढील ९ दिवसात ८३.५४ टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक म्हणाले. याचाच भाग म्हणून काही अभियंतांवर कर्तव्यात कसूर करण्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकाकडून करण्यात आल्या आहे.

बॉक्स:

कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचा आढावा

उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी वीज जोडणीचा आढावा संचालकांनी घेतला आणि मार्च २०१८ पूर्वी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम सप्टेंबरपूर्वी करण्याच्या सूचना दिल्या. एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) व पंडित दिनदयाल उपाध्याय योजना पूर्ण झाल्या असून या योजनेंतर्गत उर्वरित कामे ३१ जुलैपर्यंत करण्यात यावी. यासोबतच जिल्ह्यातील आर- एपीडीआरपी टाऊनची वीज हानी सप्टेंबर महिन्यापर्यंत किमान चार टक्क्याने कमी करण्याबरोबरच अकृषक वर्गवारीतील पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांचे अर्ज महावितरणच्या नियमावलीनुसार निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचा आधार घेऊन त्यांनी आढावा घेतला, हे विशेष!