मोहन राऊत - अमरावतीविधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नेमलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करणे सक्तीचे करण्यात आले असून मतदान न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे.संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कायद्याप्रमाणे तपासाअंती कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी मतदान करावे, याकरिता निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत़ मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सर्व प्रक्रियेचा अवलंब करीत असताना आजपर्यंतच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्याठिकाणी अल्प मतदान होते़ त्यामुळे निवडणूक आयोगाने एक पाऊल पुढे टाकले आहे़ निवडणूक प्रक्रियेत अधिकाऱ्यांना सामावून घेताना मतदान कार्ड, ओळखपत्र क्रमांक मागविण्यात आले होते़ संबंधित निवडणूक अधिकारी हा कोणत्या मतदान केंद्रावरील मतदार आहे, याची परिपूर्ण माहिती जिल्हा निवडणूक विभागाने यापूर्वीच घेतली आहे़ कर्मचाऱ्यांचे मतदान आहे त्या ठिकाणी त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विभागामार्फत इडीसी अर्ज व पोस्टल बॅलेट पेपर देण्यात येतील. ज्यांना अद्याप मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. यानंतरही मतदान न केल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
मतदान न करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: October 6, 2014 23:06 IST