शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचे तुकडे पाडल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:01 IST

जिल्हा परिषदेत विकासकामे करताना एकाच कामाचे तुकडे पाडण्याची प्रथा रूढ झाली आहे.

जिल्हा परिषद : ३ लाखांच्या आतील कामांना सीईओंची मंजुरी आवश्यक अमरावती : जिल्हा परिषदेत विकासकामे करताना एकाच कामाचे तुकडे पाडण्याची प्रथा रूढ झाली आहे. याप्रथेला पायबंद घालण्यासाठी झेडपी प्रशासनाने पावले उचलली असून यापुढे तीन लाखांच्या आतील कामांच्या मूळ अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी सीईओंची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानिर्णयामुळे एका कामांचे अनेक तुकडे पाडण्याच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे.झेडपीच्या अभियांत्रिकी विभागातील कामाचे टप्पे, सुलभीकरण, क्रमवारीचे टप्पे ठरविण्यासाठी कार्यकारी अभियंता सिंचन यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली होती. समितीने केलेल्या अभ्यासानुसार सीईओ किरण कुलकर्णी यांनी ९ मार्च रोजी आढावा घेतला. याआढाव्यात रस्ते बांधकाम, इमारती अशा कामांचे अंदाजपत्रक तयार करताना एकाच कामाचे तुकडे पाडले जात असल्याचे निदर्शनास आले. विकासकामे करण्याच्या चुकीच्या प्रकारावर पंचायतराज समितीने आक्षेप सुद्धा घेतला होता. त्यानुसार एकाच कामाचे विभाजन न करण्याबाबत शासनाने विविध परिपत्रके, शासन निर्णय जारी करून तशा सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तरीही विविध फंडे वापरून एकाच कामाचे तुकडे पाडण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी झेडपी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार यापुढे कुठल्याही परिस्थितीत कामांचे तुकडे पाडण्यात येऊ नयेत. शिवाय ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी मूळ किंमत असलेल्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. सीईओंची मंजुरी न घेताच कामाचे तुकडे पाडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)