शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:12 IST

परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे.

ठळक मुद्देसीसीएफचे फर्मान : उपवनसंरक्षकांवर सोपविली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षकांनी चौकशी समिती नेमल्याची माहिती आहे.रविवार, १९ नोव्हेबर रोजी पोस्टमार्टम न करता जमिनीत पुरविल्या गेलेल्या काळवीटचे मंगळवारी उशिरा पोस्टमार्टम करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकाºयांनी अवयव (विसेरा) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. मात्र, भारतीय वन्यजीव कायदा १९८० नुसार वन्यप्राणी वर्गवारी १ मध्ये गणल्या जाणाºया काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर नियमानुसार पोस्टमार्टम आणि दफनविधी करणे अपेक्षित होते. परंतु, नियम गुंडाळून आरएफओ ते वनपाल यांनी विषबाधेने काळवीट मृत्यूप्रकरण फारशे गांभीर्याने घेतले नाही. याबाबतचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर वनविभाग खळबळून जागा झाला. त्यानंतर परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी २१ नोव्हेबर रोजी पुन्हा घटनास्थळी जाऊन जमिनीत पुरविलेले मृत काळवीट बाहेर काढले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी मेहरे यांनी मृत काळवीटचे शवविच्छेदन केले.दरम्यान, शरीरातील अवयव बाहेर काढून ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच काळवीटाचे मृत्यू कशामुळे झाला हे अहवालाअंती स्पष्ट होईल, असे लेखी पत्र आरएफओ बारखडे यांनी दिले आहे. मात्र, मृत काळवीटचे प्रकरण वरिष्ठांना न कळविता ते परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी सीसीएफ प्रवीण चव्हाण हे फारच संतापले आहे. मृत काळवीटप्रकरणी जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कोणावर कारवाई होते, याकडे वनविभागात नजरा लागल्या आहेत.वर्गवारी १ च्या वन्यप्राण्यांबाबत अनास्था का?काळवीट हा वन्यप्राणी वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत गणला जातो. त्यामुळे अचानक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतरही ते कशामुळे दगावले, याची शहानिशा न करता परस्पर पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी संबंधित वनाधिकाºयांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वार संघटनेचे नीलेश कंचनपुरे यांनी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्याकडे केली आहे.‘वार’ संघटनेची सीसीएफकडे तक्रारकाळविटाचे मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी परस्पर दफनविधी करून पुरावे नष्ट करणारे अधिकारी, कर्मचाºयावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्यवे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वार संघटनेचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे.मृत काळवीट प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. यात दोषींवर कठोर कारवाई आदेश डीएफओ मीणा यांना दिले आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल.- प्रवीण चव्हाणमुख्य वनसंरक्षक, अमरावतीसीसीएफ यांनी मृत काळवीट प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहे. चौकशीची जबाबदारी सहायक वनसंरक्षकांवर सोपविली आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई होईल.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती. 

टॅग्स :forest departmentवनविभाग