शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात रूळ ओलांडणाऱ्या ४० जणांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: November 10, 2016 00:06 IST

रेल्व रूळ ओलांडून ये-जा करणे, हा कायदेशीर गुन्हा असतानाही काही प्रवासी अती घाई करून गाडी येण्याची चिन्हे असूनही रेल्वे रूळ ओलांडतात.

प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड : रेल्वे सुरक्षा दलाची धडक मोहीमअमरावती : रेल्व रूळ ओलांडून ये-जा करणे, हा कायदेशीर गुन्हा असतानाही काही प्रवासी अती घाई करून गाडी येण्याची चिन्हे असूनही रेल्वे रूळ ओलांडतात. बडनेरा रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशांविरुद्ध बुधवारी धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. यात रेल्वे सुरक्षा दलाने ४० जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. याबाबतचे बोेलके छायाचित्र लोकमतने प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीरेल्वे क्रॉसींगचा मुद्दा काही वर्षांपूर्वी लोकसभेत गाजला होता. त्यानंतर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरूद्ध रेल्वे कायद्यानुसार १४७ अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्यात आला. -आता निरंतर कारवाईअमरावती :या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली. मात्र, तोकड्या मुनष्यबळामुळे रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करणे शक्य नव्हते. मात्र, ही बाब ‘लोकमत’ने बोलक्या छायाचित्राच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सी.एस. पटेल यांच्या नेतृत्वात धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्याप्रवाशांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली. बुधवारी सकाळपासूनच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्यांवर पाळत ठेऊन होते. रेल्वे रूळ ओलांडताच प्रवाशांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. एक, दोन असे निरंतर प्रवासी ताब्यात घेणे सुरु असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एकूण ४० प्रवाशांविरुद्ध कारवाई केली. रेल्वे कायद्यानुसार कलम १४७ अंतर्गत ५०० रूपये दंड अथवा तुरूंगात रवानगी असे दोन पर्याय उपलब्ध होते. यात रेल्वे क्रॉसिंग करताना पकडण्यात आलेल्या ४० प्रवाशांनी दंडाची रक्कम भरून तुरुंगात जाण्यापासून सुटका केली. या धडक कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक सोबरसिंह, जमादार विठोबा मरसकोल्हे, आर. के. मिश्रा, शेरखान यांनी मोलाची कामगिरी बजावली.रेल्वे क्रॉसिंग करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे. ही कारवाई निरतंरपणे सुरुच राहते. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करु नये, असा संदेश आठवडा किंवा महिन्यातून विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाईतून दिला जातो. परंतु आता ही कारवाई सलग सुरु राहिल.- सी.एस.पटेलनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल बडनेरा.