वाहतूक पोलीस मारहाणप्रकरण : गुन्ह्याची माहिती विधानसभाध्यक्षांना परतवाडा : येथील वाहतूक शिपाईला मारहाणप्रकरणी आ. बच्चू कडूंसह तिघांचा अचलपूर जलदगती न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांची यादी व अटकेच्या परवानगीचे पत्र पोलिसांनी विधानसभाध्यक्षांना पाठविल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आ. कडू खासगी वाहनाने एका कार्यक्रमाला जात असताना स्थानीय बसस्थानकापुढे त्यांना खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या राहण्यासह दत्तूरखुद्द वाहतूक शिपायाची दुचाकी रस्त्यावर उभी होती. त्याबाबत तेथे तैनात वाहतूक शिपाई इंद्रजित चौधरी व आ. कडू यांच्यात वाद झाला होता. आपणास धक्काबुक्की व मारहाण व अश्लिल शिवीगाळ दिल्याची तक्रार वाहतूक शिपाई चौधरी यांना परतवाडा पोलिसात केली होती. परतवाडा पोलिसांनी आ. कडू, अंकूश जवंजाळ, मंगेश देशमुख व धिरज निकम विरुद्ध गुन्हे दाखल केले होते तर धिरज निकम याला पूर्वीच अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)जामीन अर्जावर दोन तास युक्तिवादआ. बच्चू कडू यांच्यावर लोटल्याच्या व शिवीगाळ केल्याचा आरोप असून सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी याने पोलिसात केली. त्यावर अटकपूर्व जामिनासाठी जलदगती न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता भोला चव्हाण, तर आ. बच्चू कडू यांच्यातर्फे महेश देशमुख यांनी जामिनावर शुक्रवारी दोन तास युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या जलदगती न्यायालयाने शनिवारी जामीन नाकारला.कडूंवर २७ पेक्षा अधिक गुन्हे आ. बच्चू कडू आपल्या अभिनव व भन्नाट आंदोलनामुळे देशभर प्रसिद्धीच्या झोतात असतात. वेगळ्या कल्पकतेच्या व जनहितार्थ असलेल्या आंदोलनादरम्यान परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, आसेगाव, मोर्शी, शिरखेड, तिवसा आदी जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांत त्यांच्यावर २७ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त केली. मंत्रालयात अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा चिठ्ठ्या विधानसभा अध्यक्षांना परतवाडा पोलिसांनी पाठविल्या आहेत.
अचलपूर न्यायालयाने फेटाळला बच्चू कडूंचा अटकपूर्व जामीन
By admin | Updated: May 1, 2016 00:09 IST