शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर नगरपालिका क्षेत्रात तेरा वर्षांपासून कर आकारणीच नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

परतवाडा : १३ वर्षांपासून अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम पूर्ण झालेल्या अनेक नव्या इमारतींचे असेसमेंट करून त्यावर नगरपरिषदेकडून कराची ...

परतवाडा : १३ वर्षांपासून अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम पूर्ण झालेल्या अनेक नव्या इमारतींचे असेसमेंट करून त्यावर नगरपरिषदेकडून कराची आकारणी करण्यात आलेली नाही.

लोक त्या इमारतींमध्ये मागील अनेक वर्षांपासून राहात आहेत. या इमारती वापरात आहेत. असे असूनही या इमारतींवर कर आकारण्यात न आल्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान, कर विभागात नागरिकांच्या हजारो फाईल या अनुषंगाने धूळ खात पडल्या आहेत. अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अचलपूर शहरचे अध्यक्ष किशोर मोहोड यांनी अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

२००९ ते २०२१ पर्यंत नगरपालिकेने त्या इमारतींच्या बांधकामाचे असेसमेंट केलेले नाही. त्यावर कर आकारला नाही. यात दवाखान्याचे बांधकाम, उद्योग संबंधित बांधकाम तसेच भव्य दिव्य इमारतीच्या बांधकामाचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

ज्या नागरिकांचे वास्तव्य नझुलच्या जागेवर आहे अशा घरांना कर लावण्यात यावा. घरकुल योजना, रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण बांधकाम झालेल्या घरकुलांनाही कर लावण्यात यावा. अनेकांकडे कराची पावती नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. पीआर कार्ड मिळविण्यातही नागरिकांना अडचणी येत असल्याचे किशोर मोहोड यांचे म्हणणे आहे.

नगरपालिकेने कराची आकारणी करावी. नगरपालिकेचे होत असलेले आर्थिक नुकसान थांबवावे. संबंधितांना कराची पावती द्यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अचलपूर शहराच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही मोहोड यांनी आपल्या निवेदनातून मुख्याधिकार्‍यांना दिला आहे.

दि 14/6/21 / फोटो नगरपालिकेचा