शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कविता प्रकरणात आरोपींची हत्येची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:23 IST

अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कविठा बु। गावात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाची कबुली अखेर आरोपींनी परतवाडा पोलिसांकडे दिली. ...

अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कविठा बु। गावात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाची कबुली अखेर आरोपींनी परतवाडा पोलिसांकडे दिली. आरोपींची कबुलीनंतर पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.

कविता बुद्रुक येथील विजय जाधव (४५) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे कविठा ते परतवाडा मार्गावर गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. तेव्हापासूनची राजकीय वैमनस्यातून घडलेली हत्या असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

परतवाडा पोलिसांनी निखिल सोनार (३०) आणि धीरज जावरकर (२५, रा. कविठा बुद्रुक) यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनीही रात्री उशिरा वैयक्तिक कारणावरून विजयच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली. यावरून या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. विजयचा चुलत भाऊ नीलेश जाधव (३७, रा. कवठा बु।) यांनी घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे फिर्याद दिली. आरोपी धीरज जावरकर व निखिल सोनार यांनी संगनमताने विजयला दुचाकीवर बसून नेले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा उपसरपंच न झाल्याने मनात द्वेष ठेवून मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान त्यांनी विजयच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार करून त्याला ठार केल्याचे फिर्यादीने जबाणी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासले. त्यात आरोपी गिरजा निखिल हे विजयला मोटरसायकलवर घेऊन जात असल्याचे दिसून आले. याच दरम्यान काही लोक त्याठिकाणी बसून असल्याचेही फुटेजमध्ये आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडेही चौकशी केली.

बॉक्स

बंदोबस्त कायम

घटनेनंतर गावात दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हाच बंदोबस्त दुसर्या दिवशीही कायम होता. गावात सर्वत्र शांतता आहे.

निर्घृण हत्या

मृतक विजयची हत्या निर्दयीपणे केल्या केली. यात त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाचा आघात केल्या गेला. त्याचे डोके, कवटी फुटली. त्यातून मेंदू बाहेर पडून लहान लहान तुकडे घटनास्थळावर विखुरले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. तसेच या घटनेतील एक आरोपी दारू व्यवसायाशी निगडित असल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुल्हाने करीत आहेत.