शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

आरोपींवर 'मोक्का' नाही

By admin | Updated: August 30, 2015 00:07 IST

अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली.

अमित बटाऊवाले खून प्रकरण : पोलीस अधीक्षकांची माहितीअमरावती/अचलपूर : अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली. पण मोक्का लावण्याएवढे त्यांचेवर गुन्हे दाखल नसल्याने मोक्का लावणे कायद्यात बसत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ‘लोेकमत’शी बोलताना दिली.रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची भरदिवसा रस्त्यावर हत्या केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पहिलीच शांतता समितीची सभा अचलपूर पोलीस ठाण्यात झाली. त्यासाठी लखमी गौतम येथे आले होते. त्यानंतर त्यांची लोकमत प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांचेशी भेटायला गर्दी केली होती. तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमितच्या घरी जाऊन त्याची आई अनिता मोहन बटाउवाले ह्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझा मुलगा अमित याच्या हत्याऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तेथे जमलेल्या लोकांनीही हीच मागणी लावून धरली होती. सदर बारुद गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु झाल्याची माहिती आहे.गौतम म्हणाले की, अजूनही अमित हत्याकांडातील दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते जर सापडलेच नाही तर त्यांच्या मालमत्ते संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेते अज्जूभाई ह्यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाला गौतम ह्यांनी उत्तर देतांना सांगितले की, गुन्हेगारावर कारवाई ही केलीच जाईल, त्याची हयगय नाही. पण सामान्य माणसांना त्रास होणार नाही. त्यांनी घाबरु नये. कुठलीही समस्या अडचण असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. कुठलीही भीती बाळगू नये. शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना गौतम आपल्या भाषणातून म्हणाले की, शाळा व महाविद्यालयांजवळ विद्यार्थिनीची छेडखानी होणार नाही. याची पोलीस विशेष दक्षता घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहन परवाना तपासणी सुरु असून ज्यांच्याजवळ परवाना नाही त्यांच्या आई-वडिलांना बोलावून दंड करा तसेच शहरात शांतता व सलोखा ठेवा यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. ज्यांचेवर गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींना शांतता समितीतून काढण्यात येणार आहे. येणारा कुठलाही सण उत्साहात, शांततेत व एकोप्याने साजरा करा असेही आवाहन त्यांनी शेवटी केले. (प्रतिनिधी)महसूल विभाग अजूनही झोपेतअमित बटाऊवाले ह्यांची हत्या रेती तस्करांनी केली. अचलपूर तालुक्यात कोट्यावधी रुपयाची रेती तस्करी झाली आहे. रेती तस्करापासून आपल्या जिवाला धोका आहे. परंतू संबंधीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुटपूंजी कारवाई करत बनवाबनवी केली. संबंधीत अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा मलीदा खाल्ला त्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेचे विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख उपेन बछेल ह्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर ह्यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. तसेच बटाउवाले कुटूंबियांना १० लाख रुपयाची शासनाने मदत करावी असेही निवेदनात नमुद केले आहे. निवेदनावर रविंद्र गवई, चेतन बाळापूरे, विठ्ठल पाटील, मंगेश सदांशिव, सुभाष देशमुख, प्रशांत अग्रवाल, चिंटू अग्रवाल, बजरंग हेकडे, ऋषी नंदवंशी ह्यांचे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.