शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट बंदोबस्तात आरोपींची न्यायालयात पेशी

By admin | Updated: November 4, 2015 00:09 IST

गांधी चौकात रविवारी रात्री घडलेल्या मुशिर आलम हत्याप्रकरणातील पाचही आरोपींना मंगळवारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मुशिर आलम हत्याकांड : पाचही आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीअमरावती : गांधी चौकात रविवारी रात्री घडलेल्या मुशिर आलम हत्याप्रकरणातील पाचही आरोपींना मंगळवारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या पाचही आरोपींना न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गांधी चौक ते जवाहर मार्गावरील जुना मोटर स्टॅन्ड परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुशिर आलमसह तनवीर आलम, जीया अहमद, चिंटू ऊर्फ मुशिर आलम व बाबा ऊर्फ मकसूद आलम या चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणातील आरोपी उमेश आठवलेंसह अंकुश सुभाष जिरापुरे (२६), नीलेश अशोक आठवले (२७) व शुभम् तात्यासाहेब जवंजाळ (३१) आणि राजू मांडवे (२५,सर्व रा.माताखिडकी, महाजनपुरा) यांनी तलवारीने हा प्राणघातक हल्ला केला होता. कायदा-सुव्यवस्था कायम राखा- सुनील देशमुखघटनेच्या पार्श्वभूमिवर सोमवारी आमदार सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या कक्षात मंगळवारी बैठक बोलविली. शहरातील अवैध व्यवसाय व गुंडगिरीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांना त्यांनी निर्देश दिलेत. शहरातील असामाजिक तत्त्वांनी मुशिरचा बळी घेतला. या गुन्हेगारावर पोलिसांचा वचक कायम राखणे गरजेचे आहे. पोलिसांनी अवैध वाहतुकीकडे लक्ष केंद्रित करावे. हातगाड्यांवर दारू पिऊन सर्रास वादविवादाच्या घटना घडतात. यातून मोठा प्रकार घडू शकतो. त्यामुळे वेळीच या गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे यावेळी आ. सुनील देशमुख म्हणाले. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कसोशीने शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आ.सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना दिल्यात. बैठकीला शोएब खान, मुजफ्फर मामू, मतीन, शेख सुलतान, नावेद पटेल उपस्थित होते.