शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

जुळ्या चेहऱ्यामुळे निरपराध गावकरी ठरला फरार आरोपी!

By admin | Updated: February 13, 2017 00:01 IST

चार वर्षांपूर्वी वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार असलेला आरोपी ताब्यात घेतला असता तो आरोपी नसून ग्रामस्थ असल्याची बाब शुक्रवारी वरूड येथे उजेडात आली.

वनकर्मचाऱ्यांचा प्रताप : अखेर माफी मागून निस्तरले प्रकरणअमरावती : चार वर्षांपूर्वी वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार असलेला आरोपी ताब्यात घेतला असता तो आरोपी नसून ग्रामस्थ असल्याची बाब शुक्रवारी वरूड येथे उजेडात आली. मात्र, संतप्त गावकऱ्यांसमोर माफी मागून वनकर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रसंग ओढवला, हे विशेष.प्राप्त माहितीनुसार, वरूड रेंजमध्ये व्याघ्र कातडी तस्करीची घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध वनविभागाने गुन्हे दाखल केले होते. यात तीन आरोपींना शिक्षादेखील झाली आहे. यात तीन आरोपी हे काटोल येथील आहेत. मात्र, वरूडनजीकच्या पवनी येथील रहिवासी विनोद राऊत हा मागील चार वर्षांपासून वाघ कातडी तस्करीप्रकरणी फरार आहे. विनोद राऊत हा घरी येत असून त्याचे गावात वास्तव्य असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी मुसळखेडा येथील यात्रेत फरार आरोपी विनोद राऊत आल्याची गोपनीय माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. यामाहितीच्या आधारे वरुड रेंज वन कर्मचाऱ्यांनी फरार आरोपी राऊत याच्या मोबाईलमधील छायाचित्राच्या आधारे यात्रेतून राऊतऐवजी प्रदीप रावणकर नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीचा चेहरा हुबेहूब फरार आरोपी राऊत याचेशी मिळता-जुळता असल्याने वनकर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद काही क्षण मनोमन साजरा केला. त्यानंतर वरूड वनवर्तुळ कार्यालयात ताब्यात घेतलेल्या रावणकर याचेवर वाघ कातडी तस्करीप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, रावणकर यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. कोणताही आरोपी ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेत असल्याने काही वनकर्मचाऱ्यांनी रावणकर याला ‘प्रसाद’ दिला. नेमके काय झाले, हेच रावणकर यांना सुरूवातीला कळले नाही. मात्र, आपण चार वर्षांपासूनचा फरार आरोपी ताब्यात घेतल्याने आता वरिष्ठांकडून कौतुक होईल, अशी मनीषा बाळगून असलेल्या वनकर्मचाऱ्यांचा अवघ्या अर्ध्या तासांतच भ्रमनिरास झाला. पकडलेली व्यक्ती ही आरोपी नसून ते मुसळखेड्यातील सर्वसामान्य रहिवासी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भाचे पुरावे गावकऱ्यांनी वनविभागाकडे सादर केलेत. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची संपूर्ण ओळख पटल्यानंतर वनविभागाने प्रदीप रावणकर यांना बिनशर्त सोडून दिले. परंतु मिळते-जुळते चेहऱ्यामुळे निरपराध व्यक्तीवर आरोपी बनण्याची वेळ आली. वनकर्मचाऱ्यांनाही खरा प्रकार उशिरा कळल्याने त्यांच्या हातून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार घडता-घडता राहिला. फरार आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तिची ओळख पटल्यानंतर त्याला सोडून दिले आहे. वनकर्मचाऱ्यांनी जुळ्या चेहऱ्यामुळे त्याला ताब्यात घेतले होते. मात्र नागरिकांनी सत्यता पटवून दिली. अनवधानाने हा प्रकार घडला आहे.- अशोक कविटकर,सहायक वनसंरक्षक, मोर्शी- वरुड