शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा चोरीप्रकरणी आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:27 IST

गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदर्यापूर पोलिसांची कारवाई : दिल्लीहून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.आरोपींनी दिल्ली येथे शिवशक्ती इंडिया फ्यूट या नावाने खोटी माहीती देऊन राठी यांच्याजवळून ४६० क्विंटल हरभरा खरेदी केला. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामध्ये २६ लाख १५ हजार ७५० रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार राठी यांनी दर्यापूर ठाण्यात केली होती. सदर प्रकरणातील दर्यापूर पोलीस ठाण्याचे पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, शिद्धार्थ आठवले, अरविंद चौहान, जयकुमार वाहाने यांच्या पथकाने ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेवून सोमनाथ बनारसीदास शर्मा (४०, रा. टिटयाना, जिल्हा कैथल), अजितशहा ऊर्फ रहेमान नागेश्वर प्रसाद (३८, रा.बीरपूर, जिल्हा बेगुसराय बिहार) या दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मनोज अत्री हा पसार आहे. पुढील तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मंगेश मोहोड शिद्धार्थ आठवले करीत आहे.