शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी पथकाने मागितला भोजनाचा हिशेब !

By admin | Updated: May 10, 2017 00:13 IST

महापालिका प्रशासनाने केलेला हागणदारीमुक्त शहराचा दावा तपासणीसाठी आलेल्या ...

आयुक्तांना पत्र : खानसाम्याकडून भोजनाच्या देयकाचे वर्गीकरण करून देण्याची विनंती लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका प्रशासनाने केलेला हागणदारीमुक्त शहराचा दावा तपासणीसाठी आलेल्या राज्यस्तरीय तपासणी समितीप्रमुखाने महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या भोजनाचा हिशेब मागितला आहे. तपासणी पथक आणि महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात केलेल्या भोजनाचे वर्गीकरण विनाविलंब करून द्यावे, असे पत्र या पथकप्रमुखाने आयुक्तांना पाठविले आहे. या अधिकृत पत्राखेरीज पथकप्रमुखाने उपायुक्तांना पाठविलेल्या व्हॉटस् अ‍ॅप संदेशानेही प्रशासकीय शिस्तीला गालबोट लागले आहे.यंत्रणेने केलेल्या ओडीएफच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी चार सदस्यीय पथक शहरात येत असल्याची माहिती नागपूरस्थित नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांनी कळविले होते. या पथकाने २ ते ४ मे दरम्यान स्वच्छताविषयक तपासणी केली. पथकातील सुधीर शंभरकर, सुहास चव्हाण, राजेश भगत आणि त्यांचा वाहनचालकाच्या निवास व भोजनाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. १ ते ४ मे दरम्यान समिती सदस्यांच्या निवासाची सोय अमरावतीच्या प्रादेशिक उपसंचालकांनी करावी, असे शंभरकर यांनी समिती सदस्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातून म्हटले होते. शंभरकर यांनीच ४ मे रोजी विश्रामगृहातील निवास व भोजनाचे १३,६७० रुपये देयकाचा भरणा खिशातून केला. त्यावेळी शंभरकर यांनी उपायुक्तांना ‘आमच्या व आमच्यासोबत आपण जेवण केले, त्यासर्व जेवणाचे व राहण्याचे पैसे तपासणी समितीने अदा केले आहे. आपण काळजी करू नये, असा संदेश दिला. ५ मे रोजी शंभरकर यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने आयुक्त हेमंत पवार यांच्या नावाने पत्र लिहून विश्रामगृहाचे देयक सुधारित करून पाठविण्याचे कळविले. राज्यस्तरीय समितीच्या निवास व भोजनाचे १३,६७० रुपये आपण अदा केले. मात्र समिती सदस्य आणि वाहनचालकाचा खर्चाशिवाय महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाश्ता, जेवण, चहापाणी हा खर्च अनुज्ञेय होत नाही. त्यामुळे नवीन विश्रामगृहातील खानसाम्याशी संपर्क साधून समिती सदस्यांचा खर्च आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा खर्च अशी दोन वेगवेगळी विभागलेली देयके शक्य तितक्या लवकर पाठविण्याची व्यवस्था करावी, असे शंभरकर यांनी या पत्रातून सुचविले आहे. कोणी किती भोजन केले, कुणी किती मांसाहार केला, तपासणी पथकाने कितीदा मांसाहार केला, महापालिका कर्मचाऱ्यांनी किती प्लेट नाश्ता घेतला याचा हिशेब महापालिकेला शंभरकर यांना पाठवायचा आहे. विशेष म्हणजे शंभरकर यांच्या नेतृत्वातील या पथकाने आयुक्तांच्या शहर हागणदारीमुक्तीचा दावा फेटाळून लावत पाच आक्षेप नोंदविले आहे. अद्यापपर्यंत पालिकेने सुधारित देयक पाठविले नाही.आम्ही भोजन केलेच नाहीशंभरकर यांनी केलेला दावा महापालिका प्रशासनाने नाकारला आहे. २ मे रोजी तपासणी पथकासोबत सौजन्य म्हणून आपण नाश्ता केला. ते देयकही आपण देण्यास तयार होतो, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.वास्तविक या पथकाने महापालिकेशी संपर्क न साधता तटस्थपणे दाव्याची वैधता तपासावी, असे निर्देश होते. देयकाच्या वर्गीकरणाबाबत प्रादेशिक उपसंचालकांचे पत्र मिळाले. त्याबाबत प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.- हेमंत पवार, आयुक्त