शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची पीडीएमसी, सुपर स्पेशालिटीत आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.  रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये.

ठळक मुद्देऑक्सिजन प्लांटची पाहणी, कोविड रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांना  ऑक्सिजनचा पुरवठा होण्याबाबत समस्या निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पीडीएमएमसी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबतची माहिती घेतली.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये ४५ अतिरिक्त बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. रुग्णसेवा पुरविताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.  रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये. तसे निदर्शनास आले तर ती तत्काळ दूर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शंभर टक्के खबरदारी आवश्यकसुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा सुसज्ज करावी. रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टॉफशीही त्यांनी संवाद साधला. सध्याचा काळ कठीण आहे. आपली स्वत:ची सुरक्षितता जोपासून आपण सर्वांनी मिळून या कठीण काळावर मात करायची आहे.   शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.   

रुग्णांच्या आप्तांशी संवाद सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून ना. ठाकूर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही.  त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी रुग्णांच्या आप्तांना  एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीhospitalहॉस्पिटल