पोलीस विभागात शोककळा : नातेवाईकांचा इर्विनमध्ये आक्रोशअमरावती : चार्ज देऊन निघताच वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय रमेश गिरी (५०, रा.रविनगर) हे भोवळ येऊन खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास इर्विन येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात घडली. या घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणला असता त्यांच्या नातलगांनी हृदयद्रावक आक्रोश केला. सन २०१४ पासून वाहतूक शाखेत सेवा देणारे संजय गिरी हे पत्नी, मुलगा दर्शन (१८) व मुलगी पूजा (२३) सह रविनगरातील गजानन महाराज मंदिराजवळ राहतात. त्यांना फिट येण्याचा आजार असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी ते गाडगेनगर झोनच्या इर्विन येथील वाहतूक शाखेत सेवा देऊन घरी जाण्यासाठी निघत होते. त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चार्जही दिला होता. तेव्हाच ते अचानक ते भोवळ येऊन खाली पडले. तत्काळ काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना इर्विन रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिरी यांचे मरणोपरांत नेत्रदानसंजय गिरी यांच्या निधनापश्चात त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. सोमवारी सायंकाळी ५ वाजता नेत्रदान प्रक्रिया पार पडली. यावेळी शल्य चिकित्सक गायत्री फडणवीस, उद्धव जुकरे, हरिना नेत्रदान समितीचे अध्यक्ष मनोज राठी, चंद्रकांत पोपट व गिल्डा उपस्थित होते.
वाहतूक शाखेच्या एएसआयचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:02 IST