धारणी : तालुक्यातील बेरदाभुरू गावातील वऱ्हाडी मध्य प्रदेशात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शुक्रवारी सकाळी ११ वाजता धूळघाट गावाजवळ अपघात झाला. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, २० लोकांना गंभीर दुखापत आहे. धूळघाट ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदत केली.जखमींमध्ये जशोदा साबूलाल कासदेकर (६०), मनीषा कुमरसिंह कासदेकर (५१), पिंकी राजू दहिकर (३२, रा. घुटी), राशी राजू कासदेकर (५१, रा. घुटी), शोभवती सतीश चतुर (३०, रा. नागझिरा), अक्षय रामेश्वर चतुर (९, रा. नागझिरा), मनीषा सतीश चतुर (३१, रा. नागझिरा), द्रौपदी बन्सीलाल कासदेकर (६०, रा. रत्नापूर), फुकराई सीताराम चतुर (५५, रा. घुटी), प्रमिला कुंजीलाल जांभेकर (३५, रा. बेरदाभुरू), लाडकी रामकिसन पतोरकार (४०, रा. बेरदाभुरू), कांता मौजीलाल चतुर (३०, रा. नागझिरा), बन्सी सोमलाल पतोरकार (३५), पार्वती बालाजी कासडे (६०), ताराबाई मौजीलाल चतुर, समोती बाळू मावस्कर, लीला दादू पतोरकार (२७), कसुबाई चुन्नीलाल पतोरकार, रेखाबाई श्यामलाल मावस्कर यांचा समावेश आहे. त्यापैकी पाच जणांना गंभीर दुखापत झाल्याने अमरावती येथे दाखल करण्यात आले, तर काही जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालय तसेच कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होत आहेत.
धूळघाट गावाजवळ वऱ्हाडींच्या ट्रॅक्टरला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:42 IST
तालुक्यातील बेरदाभुरू गावातील वऱ्हाडी मध्य प्रदेशात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शुक्रवारी सकाळी ११ वाजता धूळघाट गावाजवळ अपघात झाला. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, २० लोकांना गंभीर दुखापत आहे. धूळघाट ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदत केली.
धूळघाट गावाजवळ वऱ्हाडींच्या ट्रॅक्टरला अपघात
ठळक मुद्दे२० जखमी : नागरिकांकडून मदत