शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार आश्रमाशी परिचित

By admin | Updated: August 12, 2016 00:12 IST

सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत.

अमरावती : सामान्य मानसिकतेत वावरणाऱ्या व्यक्तीने करावेत, असे ते नाहीत. सरावलेल्या व्यक्तिने करावे, असेच ते आहेत. ज्याच्या मनावर गुन्हेगारीचा खोलवर पगडा असेल, गुन्हेगारीच्या छटा ज्याला परिचित असतील, अशा व्यक्तिने हे वार केलेले असावेत, असे मत मानसतज्ज्ञांचे आहे. मानेवर वार करणे सहजसाध्य प्रक्रिया नाही. या हल्ल्यात त्यामुळेच एकापेक्षा अधिक हल्लेखोर सहभागी असण्याची शक्यता अधिक आहे. कुणी मान चिरत असेल आणि ती चिरू दिली जाईल, असे अशक्यच आहे. संपूर्ण ताकदीनिशी तो प्रतिकार करणारच. सारीच शक्ती एकवटून केलेला त्याचा तो प्रतिकार रोखण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तिंची गरज आहे. प्रथमेशवर गुदरलेल्या प्रसंगातही शक्तीशाली आणि खुनशी मानसिकतेच्या एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहेच. हे देखील तपासावे मुलामुलांच्या टोळ्या असणे. कुठल्याशा मुद्यावरून त्यांच्यात संघर्ष असणे. वारंवार त्यासाठी खटके उडणे आणि दोन टोळ्यांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे कुठल्या एका बधिर क्षणाला असा गुन्हा घडण्याची शक्यता असू शकते. मुलांना भोजन देण्यासाठी, त्यांच्या देखरेखीच्या कामासाठी काही युवक आश्रमपरिसरातच वास्तव्याला आहेत. ही मुले पिंपळखुटा वा परिसरातील असल्यामुळे आणि प्रथमेशपेक्षा वयाने मोठी असल्यामुळे त्यांचा या प्रथमेशसम मुलांवर धाक ठेवण्याचा प्रकारही नजरेआड घालता येणार नाही. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाने पिंपळखुट्यातील स्थायी मुले बलवान झाल्याने शिक्षणासाठी येणाऱ्या ‘पाहुण्या’ मुलांवर ते हुकूमत गाजवू शकतात. न जुमानणाऱ्या मुलांना धडा शिकिवण्याच्या मानसिकतेतून असे अतिरेकी गुन्हेगारी कृत्य घडू शकते. घडलेला प्रकार बांधकाम सुरू असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी घडला आहे. अर्थात आडोशाला घडलेला आहे. सुटीच्या दिवशी आणि सहज कुणाचे लक्ष जाणार नाही, अशी जागा हल्ल्यासाठी निवडली गेली. त्यामुळेच गुन्हेगार आश्रमाशी सुपरिचित असण्याच्या शक्यतेला विशेष बळ मिळते. तपास त्यादृष्टीनेही केला जावा.