शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसीच्या पत्रपरिषदेला आमदारांची अनुपस्थिती

By admin | Updated: November 8, 2015 00:15 IST

गेली दोन दिवस जिल्हा परिषदेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पंचायतराज समितीच्या प्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमरावती : गेली दोन दिवस जिल्हा परिषदेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पंचायतराज समितीच्या प्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र या पत्रपरिषदेला समितीमधील एकाही आमदाराने उपस्थिती लावली नाही. समितीप्रमुख संभाजी निलंगेकर पाटील यांनी पत्रपरिषदेदरम्यान अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत आढळून आलेल्या अनियमिततेवर बोट ठेवले. पीआरसी दोन दिवसांच्या पाहणीदरम्यान काय आढळले, याचा गोषवारा निलंगेकर पाटलांकडून दिला गेला. यावेळी पंचायतराज समिती पीआरसीच्या सदस्यांऐवजी शहर भाजपचे अध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे महापालिकेतील गटनेते संजय अग्रवाल आणि भाजयुमोचे प्रदेश पदाधिकारी प्रताप अडसड यांची उपस्थिती होती. संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे प्रदेश महामंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे पीआरसीसंदर्भात माध्यमांशी बोलताना ते महामंत्री म्हणून की पीआरसीचे प्रमुख म्हणून माध्यमांना सामोरे गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे २५ सदस्यीय पंचायत राज समितीच्या प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अन्य १२ आमदार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र परिषदेला निलंगेकर वगळता अन्य एकाही आमदारांची उपस्थिती नव्हती.पत्रपरिषदेदरम्यान निलंगेकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आतापर्यंत समितीप्रमुख म्हणून आपण ६ जिल्हा परिषदांचा धांडोळा घेतला. त्यात अमरावती जिल्हा परिषदेचे कामकाज ढेपाळले असल्याचे ते म्हणाले. पंचायत राज समितीला ज्या अनियमितता आढळल्या त्या निलंगेकर यांनी विशद केला. फक्त सांख्यिकी दिले नाही. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान ‘गोपनियता’ कशी राहिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून पंचायतराज समितीत भाजपच्या अधिकाधिक आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे विधिमंडळात अहवाल देण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील अनियमितता माध्यमांसमोर उघड करण्याचा मोह निलंगेकर पाटलांना आवरता आला नाही, अशी चर्चा शनिवारी जि.प. वर्तुळात होती. पत्रपरिषदेचे शुल्कसुद्धा भाजपचे शहर अध्यक्ष तुषार भारतीय यांनी चुकविले त्यामुळे ही पत्रपरिषद निलंगेकर पाटलांनी भाजपचा महामंत्री म्हणून घेतली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाजपचा महामंत्री म्हणून पत्रकार परिषद घेतली असल्यास भारतीय, अग्रवाल आणि अडसडांची उपस्थिती समर्थनीय ठरते. मात्र त्यात पीआरसी प्रमुख म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची केलेली चिरफाड संभ्रमात टाकणारी आहे. (प्रतिनिधी)