शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा बट्ट्याबोळ, १९ शाळांची पटसंख्या पन्नाशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:01 IST

महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी लक्ष देतील का? : महापालिका आयुक्तांचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ चालविलाय, हे विद्यार्थिसंख्येअभावी दोन शाळा बंद करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अपयश सांगण्यास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.शिक्षण विभागानुसार, शहरात महापालिकेच्या ६४ शाळा आहेत. त्यात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. पैकी अंबिकानगर येथील हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १२ मध्ये पहिली ते पाचवी या वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे ती शाळा बंद करण्यात येणार आहे. जमील कॉलनी येथील मनपा उर्दू माध्यमिक शाळेत केवळ आठवीतच विद्यार्थी असल्याने ही शाळा दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १९ शाळांमध्ये सरासरी ३ ते ४८ विद्यार्थी संख्या असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पटसंख्येचे हे वास्तव मांडून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा महापालिका शाळांमधील काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. घटत्या पटसंख्येसंदर्भात शिक्षण विभागाने करावयाच्या उपाययोजना व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी गतवर्षी विशेष आमसभेची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशेष आमसभेत शिक्षण विभागावर चर्चा झाल्यास लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीने ती आमसभा घेण्यास प्रशासनाने नकार दिला. मात्र, यंदाही महापालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्येत झपाट्याने घट झाल्याने आयुक्त संजय निपाणे यांनी पुढाकार घेऊन विशेष आमसभा बोलवावी, असा सूर उमटला आहे.एकूण ८७०८ विद्यार्थीमहापालिकेच्या एकूण ६४ शाळांमध्ये ८७०८ विद्यार्थी आहेत. त्यात पहिलीत १११९, दुसरी व तिसरीत प्रत्येकी १२०३, इयत्ता चौथीत १२६५ व पाचवीत १२१३ असे पाच वर्ग मिळून ६००३ विद्यार्थी आहेत. इयत्ता सहावीत ९२३, सातवीत ९०९ व आठवीत ८७३ विद्यार्थी असल्याची नोंद महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे.