शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण 'अल्कोहोलिक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:19 IST

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये २० टक्के अल्कोहोलिक रुग्णांचा समावेश तपासणीअंती आढळून येत आहे. शासनाने मद्यसेवनावर नियंत्रण आणल्यास प्रत्येक रुग्णालयातील गर्दी निश्चित कमी होईल. यातून आरोग्यहित निश्चित साध्य होईल, असा विश्वास इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूंनी व्यक्त केला.

ठळक मुद्देवैद्यकीय सूत्र : मानसिक तज्ज्ञांकडून समुपदेशन

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये २० टक्के अल्कोहोलिक रुग्णांचा समावेश तपासणीअंती आढळून येत आहे. शासनाने मद्यसेवनावर नियंत्रण आणल्यास प्रत्येक रुग्णालयातील गर्दी निश्चित कमी होईल. यातून आरोग्यहित निश्चित साध्य होईल, असा विश्वास इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूंनी व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी वार्ड क्रमांक ८ मध्ये ४८ रुग्ण उपचार घेताना आढळले. त्यात वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भारसवाडा येथील रुग्ण दिवाकर नामदेवराव काकडे यांच्या पोटात पाणी होऊन आकार वाढत आहे. ते अवघे ३५ वर्षांचे असताना त्यांच्यावर ही वेळ केवळ दारू सेवनामुळे आली. जानेवारी २०१९ पर्यंत १९ हजार रुग्ण दाखल झालेत. येथे नि:शुल्क सेवा मिळत असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयातून रुग्णांची आवक आहे. यामध्ये अल्कोहोलने बाधित रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांवर असल्याचा रोजचा अनुभव वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला. यामध्ये यकृत निकामी झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आढळल्याचे सांगण्यात आले.लक्षणे : अधिक प्रमाणात अल्कोहोल सेवन हेच यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. यकृत निकामी होण्यास ९० टक्के अल्कोहोल, ५ टक्के इन्फेक्शनमुळे तर ५ टक्के जेनेटिक कारणीभूत असते. मद्य सेवन करणाऱ्यांना सुरुवातीला कावीळचा आजार होतो. ती पहिली पायरी असते. यातच सावरून मद्य सेवन पूर्णपणे बंद केल्यास हा आजार कायमस्वरुपी नष्ट होतो. मात्र दुसºया स्टेपमध्ये तात्पूर्ते उपचारावर समाधान मानावे लागते. तिसऱ्या स्टेपमध्ये पोटात पाणी वाढून रुग्ण दगावतो.- ५० टक्के आरोग्य सुधारण्यास वावशासनाने अल्कोहोल प्रतिबंधित केल्यास आजारांचे प्रमाण तर कमी होईलच; परंतु अपघाताचे प्रमाणदेखील घटण्यास मदत होईल. तेव्हाच रुग्णालये ५० टक्के रिकामे राहतील, असा विश्वास वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला.इर्विनमध्ये ३५० रुग्ण घेताहेत उपचारसध्या तीव्र उन्हाचे चटके असह्य झाल्याने व जिल्ह्यातील काही भागांत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ३५० रुग्ण दाखल असून, शेकडो रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज करण्यात येत आहे. सोमवारी नव्याने १०० रुग्ण दाखल झाल्याची माहिती मेट्रन मंदा गाढवे यांनी दिली.दारूच्या आहारी जाऊ नका, मद्यसेवनाऐवजी सकस आहार घेऊन आनंदी जीवन जगा, असा सल्ला येथे उपचारार्थ येणाºया रुग्णांना मानसतज्ज्ञांद्वारा समुपदेशन केले जात आहे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन