शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

महिला डॉक्टरने केला इच्छेविरुद्ध गर्भपात

By admin | Updated: January 21, 2017 00:01 IST

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा जबरीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी शिवशक्ती कॉलनीत उघडकीस आली.

पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा : शारीरिक-मानसिक छळ, शिवशक्ती कॉलनीतील घटना अमरावती : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा जबरीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी शिवशक्ती कॉलनीत उघडकीस आली. विवाहितेच्या पतीने महिला डॉक्टरशी संगनमत करून तिच्या ईच्छेविरूद्ध गर्भपात केल्याचा गुन्हा राजापेठ पोलिसांनी गुरूवारी नोंदविला. पोलीस सूत्रांनुसार, विनित रामचंद्र नाईक, रामचंद्र उपासराव नाईक व दोन महिला (रा. शिवशक्ती कॉलनी) व प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू (रा. स्वस्तीक नगर) अशी आरोपींची नावे आहेत. अमरावतीमधील एका तरुणीचा शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी विनित रामचंद्र नाईक याच्याशी दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस सगळे सुरळीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी विवाहितेचे सोन्याचे दागिने कपाटातून चोरीला गेले होते. त्यावेळी तिने सासरच्या मंडळींवर संशय घेतला होता. या अपमानाचा सल मनात ठेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला होता. दरम्यानच्या काळात ती गर्भवती झाली. तिच्यावर स्वस्तिकनगरातील प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सासरच्या मंडळींनी गर्भार अवस्थेत तिचा शारीरिक, मानसिक छळ करून गर्भपाताच्या उद्देशाने गोळ्याही दिल्यात. परिणामी तिची प्रकृती बिघडली. रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिला प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपी विनित नाईक याने डॉक्टरांना हाताशी धरून पत्नीच्या इच्छेविरूद्ध गर्भपात करून घेतल्याचे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. याघटनेची तक्रार पीडितेने राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली असून पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३१३, ४९८(अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा प्राथमिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर करीत आहेत. (प्रतिनिधी)पीडित महिलेचा शारिरिक व मानसिक छळ करून तिच्या इच्छेविरूद्ध गर्भपात केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या मंडळींसह महिला डॉक्टरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेच्या गर्भपातप्रक्रियेचे सर्व दस्तेऐवज महिला डॉक्टरकडून मागविण्यात आले आहेत.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे. दाम्पत्य काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य गर्भपात करण्यासाठी आले होते. मात्र, मी नकार दिला होता. काही दिवसानंतर ती महिला रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत रुग्णालयात आली. तिची स्थिती नाजूक असल्यामुळे मी तिला दाखल करून घेतले. - वासंती कडू, प्रसुतीतज्ज्ञ,