अमरावती : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय व चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशन यांच्या
संयुक्त विद्यमाने अमरावती येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे चाईल्ड लाईन १०९८ अंतर्गत १७ ते ३१ मार्च दरम्यान सुरक्षित बालपण पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध कार्यक्रम सादर होणार आहेत.
------------
योगसाधना महिलांसाठी वरदान
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात योगविषयक सत्र पार पडले. श्रीकांत पाटील यांनी योगसाधना महिलांसाठी वरदान असल्याचे सांगितले. याप्रसंगी मंजूषा गोपाल उताणे, वैशाली गाडे, अश्विनी राऊत, स्वप्निल मोरे, स्वप्निल ईखार आदी सहभागी झाले.
-----------
ज्येष्ठांची मोबाईलवर लसीकरणासाठी नोंदणी
अमरावती : ६० वर्षांवरील वयोवृद्ध व ४५ वर्षांवरील को-मॉर्बिड आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. अमरावती जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. नोंदणी ही कोविन पोर्टलवर होत असून, त्यासाठी विशिष्ट ॲप नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.