अमरावती : संत गाडगेबाबा प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती पार पडली. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तारचे संचालक श्रीकांत पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारत कऱ्हाड तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------
२० मार्चला दिवस-रात्र समान
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : दिवस व रात्र समान वेळ नोंदविणारा विषुवदिन यंदा २० मार्च रोजी आहे. या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असल्याने ही घटना घडते. हौशी खगोल अभ्यासकांनी या दिवशी कालमापन करून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन अमरावती येथील खगोल अभ्यास प्रवीण गुल्हाने व विजय गिरूळकर यांनी केले आहे.
-------
ग्रामीण भागात घरकुल लाभार्थींना अधिकाऱ्यांच्या भेटी
अमरावती : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाची कामे सुरू करावी, यासाठी जिल्ह्यातील चौदाही पंचायत समित्यांमार्फत अधिकारी भेटी देऊन लाभार्थींसोबत संवाद साधत आहे. मंजूर, पण सुरू न केलेली कामे तातडीने सुरू करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या जात आहेत.