शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

रोजगार हमी योजनेसाठी ‘आधार’ अनिवार्य

By admin | Updated: May 31, 2016 00:07 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे.

न्यायालयाचे निर्देश : १६ हजार मजूर नोंदणीपासून वंचितअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे. त्याकरिता १५ जून ही तारीख अंतिम असून जिल्ह्यात अद्यापही १६ हजार रोहयोचे मजूर आधार नोंदणीपासून वंचित असल्याची माहिती आहे.रोहयोत अनियमितता, मजुरांच्या वेतनात गौडबंगाल आदी बाबी रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत मजुरांचे खाते उघडले जात आहे. त्याकरिता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. जिल्ह्यात रोहयोचे १ लाख ७६ हजार ६१९ मजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ६१७ मजुरांची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे. १६ हजार ५०४ एवढे मजूर आधार कार्ड नोंदणीपासून वंचित आहेत. रोहयोच्या सरासरीनुसार ९० टक्के मजुरांचे आधार कार्ड राष्ट्रीयीकृत बँकाना जोडण्यात आले आहे. केवळ १० टक्के मजूर आधार नोंदणीपासून वंचित आहेत. अशा मजुरांची नव्याने आधार कार्ड नोंदणी करुन १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत रिकाम्या हाताला कामे मिळावी, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे जिल्ह्यात जोरात सुरु असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे यांनी सांगितले. १५ जूनपर्यंत आधारची नोंदणी करून प्रत्येक रोहयोच्या मजुरांना राष्ट्रीयकृत बँकेशी जोडले जाणार आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने अवगत केले आहे. १४५ कोटींपैकी चिखलदरा, धारणी या तालुक्यात ६५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. राज्यात रोहयोची १४५ कोटी रुपयांची कामे करण्यात अमरावती जिल्हा अव्वल असल्याचा बहुमान पटकाविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन, कृषि, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आदी यंत्रणेमार्फत रोहयोची कामे केली जातात. विभागाच्या मागणीनुसार रोहयोची कामे मंजूर केली जातात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून निधी वळता केला जातो. मात्र मेळघाटात आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयो जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात रोहयोच्या ८४०१६ मजुरांची पोस्टात खाते असून ते लवकरच राष्ट्रीयकृत बँकेत वळती केली जाणार आहे. ७४११३ रोहयो मजुरांचे राष्ट्रीयीकृत बँकेत आधारकार्ड क्रमांक जोडणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्यात रोहयो मजुरांची संख्याअचलपूर १०५५३, अमरावती ५०२०, अंजनगाव सूर्जी २४७७, भातकुली ४८२८, चांदूर बाजार ११०७०, चांदूर रेल्वे ९५५२, दर्यापूर ५५२४, धामणगाव रेल्वे ६०४०, धारणी ३४८७१, मोर्शी १७९२१, नांदगाव खंडेश्वर ८३११, तिवसा ६२१७, वरुड १०६१९३१ मार्च २०१६ पर्यत जिल्ह्यात १४४ कोटी रुपये रोहयोंवर खर्च करण्यात आले आहे. ही आकडेवारी राज्यात सर्वाधिक ठरली आहे. कुशल, अर्धकुशल मजुरांना कामे दिली जात आहेत. रोहयोच्या सर्वच मजुरांचे आधार कार्ड क्रमांकाशी नोंदणी केली जाणार आहे.- आर. डी. काळे,उपजिल्हाधिकारी, रोहयो