शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अबब! मातीचे घर ४५ लाखांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:30 IST

निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देखोपडा येथील मूल्यांकन। सीआयडी चौकशीची मागणी, बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखडे यांच्या एकाच कुटुंबाच्या घराचे मूल्यांकन १ कोटी १७ लाख रुपये, तर उपसरपंच हरिदास लुंगे यांच्या घराचे मूल्यांकन ५१ लाख ८५ हजार रुपये दाखविले आहे. रोजंदारी कर्मचारी अजिंक्य लुंगे यांचे घर ५७ लाख ८६ हजारांचे दाखविले, तर मातीच्या अन्य घरांचा मोबदला २ ते १० लाखांच्या घरात आहे. मोजक्याच लोकांच्या घरांचे मूल्यांकन अर्धा ते एक कोटीच्या घरात कसे गेले, असा ग्रामस्थांचा रोकडा सवाल आहे. घरांच्या सर्वेक्षणात मूल्यांकन अधिकारी, सरपंच, ग्रामसचिव व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर घोळ केल्याच्या निषेधार्थ खोपडा येथील ५०० ते ५५० महिला-पुरुषांनी २६ फेब्रुवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर प्रशासन हादरले व खोपडा गावातील संपादित घरांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने घरांच्या मूल्यांकनाबाबत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून ग्रामपंचायतला अहवाल प्राप्त झाला. अहवालही सदोषमूल्यांकन अहवालामध्ये घर क्रमांक, घरमालकांचे नाव, घराची किंमत व एकूण रक्कम इतकेच रकाने दर्शविण्यात आले. अहवालात घराचे चौरस क्षेत्रफळ, मातीचे की सिमेंटचे, याची कोणतीही नोंद नाही. कोणत्या दराने घराचे मूल्यांकन केले, याची माहिती अहवालात नाही.दोषींवर व्हावी कारवाईबांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदधिकारी हे सर्व घटक अनियमिततेस जबाबदार असल्याने त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.काय आहे अहवालात?गावातील एका मातीच्या घराचे मूल्यांकन ४५ लाख ६० हजार दाखविले आहे तसेच घर क्रमांक ४३ चे मूल्य दोनवेळा दर्शविले आहे. एका सिमेंटच्या घराचे मूल्य ६२ लाख ३० हजार रुपये दर्शविण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मूल्यांकन अधिकाºयांना हाताशी धरून घरांच्या किमती वाढवून घेतल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.