शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन

By प्रदीप भाकरे | Updated: October 23, 2023 16:42 IST

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी, ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे.

अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ७३ शहरांमध्ये ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविले जाणार आहे. यात पश्चिम विदर्भातील नऊ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांना सुखसोयी मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे शहरांचे सौंदर्य टिकून राहावे, यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार आहे. ‘नमो’ अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा खुलवणार आहे.

‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. यात अमरावती महापालिका, चिखलदरा नगर परिषद व तिवसा या नगर पंचायतीचा समावेश आहे. हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजसुधारक, प्रसिद्ध व्यक्ती यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध स्पर्धा-निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित करण्याचे निर्देश शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी संबंधित आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अभियानात काय?

शहरातील जलाशय, पाणीसाठे यांची स्वच्छता करून सौंदर्यीकरण, शहरातील बागबगीचे/उद्याने, खेळाची मैदाने यांची स्वच्छता करून त्याठिकाणी आवश्यक ते सुशोभिकरण, खेळाचे साहित्य व इतर आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता, पादचारी मार्ग/पथ, विविध प्रकारची फुलांची झाडे, विविध मैदानी खेळांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे, तेथे भित्तीचित्रे, कारंजे, शिल्प उभारणे व सामाजिक संदेश देणारे व जनजागृती करणारे चित्र रेखाटणे.

यांचीही स्वच्छता, सौंदर्यीकरण अनिवार्यशहरातील प्रमुख इमारती, शाळा, महाविद्यालये, हेरिटेज इमारती, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, झोपडपट्टी, गावठाण परिसर यांची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करावे. शहरातील बाजारपेठा, व्यावसायिक ठिकाणे, सार्वजनिक शौचालये यांची स्वच्छता करून त्याठिकाणी सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश महापालिका व नगर परिषदांना देण्यात आले आहेत.

कार्यगट करेल अंमलबजावणीनमो ११ कलमी कार्यक्रमांतर्गत शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत निवड केलेल्या शहरांमध्ये ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्याकरिता संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यगट स्थापन केला जाईल. आयुक्त/मुख्याधिकारी कार्यगटाचे अध्यक्ष असतील. तर शहर अभियंता, नगर अभियंता, नगररचनाकार, आरोग्य व स्वच्छता अधिकारी हे सदस्य असतील. अधिकृत बांधकाम विकासक संघटना, वास्तुविशारद, कलाकार, प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील यात असतील.