शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रक्तदान करून ३ महिन्याच्या गर्भवतीचे वाचविले प्राण; इम्रान उलहक यांनी दिला मानवतेचा परिचय  

By उज्वल भालेकर | Updated: May 26, 2024 18:56 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाने तयार केेलेल्या रक्तदात्यांच्या एका ग्रुपमध्ये ही माहिती देण्यात आली.

अमरावती : तीन महिन्याच्या एका गर्भवती महिलेला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच हैदरपुरा येथील रहिवासी व्यापारी इमरान उलहक इजहार उलहक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. इमरान यांच्या या रक्तदानामुळेच २.८ ग्रॅम हिमोग्लोबिन असलेल्या अनिता इवने या २४ वर्षीय महिलेला नवे जीवनदान मिळाले आहे. रक्तदानातून इमरान उलहक  यांनी मानवतेचा परिचय समाजाला करून दिला आहे.

अचलपूर तालुक्यातील सालेपूर पांढरी येथील अनिता इवने या तीन महिन्यांच्या गर्भवतीची प्रकृती बिघडल्याने तिला २४ मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे अनिताची तपासणी केली असता तिचे हिमोग्लोबिन २.८ ग्रॅम असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनिताला रक्ताची नितांत गरज होती. परंतु, सध्या जिल्ह्यात सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने अनिताला आवश्यक ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे कठीण जात होते. 

अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयाने तयार केेलेल्या रक्तदात्यांच्या एका ग्रुपमध्ये ही माहिती देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्याच्या इतर भागातील गरजू रुग्णांना या ग्रुपच्या सदस्यांकडून आवश्यक रक्त पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. डफरीन रुग्णालयातील समुपदेशक प्रकाश खडके यांनीही रक्तासाठी अनेक रक्तदात्यांशी संपर्क साधला. यावेळी इमरान उलहक इजहार उलहक यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रक्तदानासाठी होकार दिला आणि त्यानंतर त्यांनी २५ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अनिता इवने यांच्यासाठी रक्तदान केले. या रक्तामुळे अनिता हिला नवे जीवनदान मिळाले असून, तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती विस्तार अधिकारी कविता पवार यांनी दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती