शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:40 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला.

ठळक मुद्देधक्कादायक : दोन दिवसांत एका शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर दोन दिवसात एक शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामूळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मूलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१८ पर्यत तीन हजार ५५४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ९७२ प्रकरणे पात्र, १ हजार ९७२ अपात्र तर ५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. निराषेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्तिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असतांना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.२००१ पासूनच ३,४१८ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३,५२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिण्यात २६७, फेब्रूवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २७२, जुलै २८४, आॅगष्ट ३४३, सप्टेंबर ३३५, आॅक्टोंबर ३१४, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिण्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शेतकरी मिशन अपयशीराज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारणे कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशलला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र शेतकºयांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पुर्णपणे अपयश आले आहे.यंदा आॅक्टोबर महिण्यात २९ आत्महत्या*यंदा १९९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २९ घटना आॅक्टोबर महिण्यातील आहेत. जानेवारी २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४, जून १५, जुलै २०, आॅगष्ट १९ सप्ष्टेंबर २०व आॅक्टोबर महिण्यात २९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.