अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी मंगळवार १५ सप्टेंबर रोजी शहर आणि ग्रामीणमधील ११ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुक ीतील ७३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला बुधवारी होणार आहे.या निवडणुकीत एकू ण ३ हजार २६२ मतदारांपैकी ३ हजार १३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ हजार ४०९ पुरूष आणि ७२१ महिला मतदारांचा समावेश आहे. अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत तीन पॅनेल व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघातून एकूण ११, सर्वसाधारण मतदारसंघातून ७, महिला मतदार संघातून २, इतर मागासवर्गातून १, आणि विमुत जाती, भटक्या जमाती मतदार संघातून १ या प्रमाणे संचालक निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ४ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये सर्वसाधारणमधून २, अ. जाती, जमाती मतदारसंघातून १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून एक याप्रमाणे संचालक निवडून द्यायचे आहेत.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ९६ टक्के मतदान
By admin | Updated: September 16, 2015 00:19 IST