शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

९४ हजारावर विद्यार्थ्याची देणार संकलित मूल्यमापन चाचणी

By जितेंद्र दखने | Updated: April 3, 2024 22:34 IST

४ ते ६ एप्रिलपर्यंत परीक्षा : तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्याचा सहभाग

अमरावती : इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्याची संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे आयोजन ४ ते ६ एप्रिल दरम्यान केले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून संकलित मूल्यमापन चाचणी-२ तसेच पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन केले जाते. संकलित मूल्यमापन चाचणींतर्गत जिल्ह्यातील शासकीय, खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ हजार ५१७ शाळांमधील तिसरी ते आठवीच्या सुमारे ९४ हजार ७३९ विद्यार्थ्याची चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्याची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे.

शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणामांचे बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी अनुदानित जिल्ह्यातील २ हजार ७३९ शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या ९४ हजार ७३९ विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी ४ एप्रिलपासून संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) घेतली जाणार आहे.या मुल्यमापन चाचणीतून गुरूजींनी नेमके किती व कसे अध्यापन केले, मुले किती शिकली, त्यांना किती समजले हे कळणार आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.याकरीता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेकडूृन चाचणी दरम्यान भेटीसाठी नियोजन केले आहे. यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख आदी संकलीत मूल्यमापन चाचणी दरम्यान भेटी देणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांनी सांगितले.

असे आहे संकलित मूल्यमापन चाचणी २ चे वेळापत्रकप्रथम भाषा (सर्व माध्यम)-४ एप्रिल- तिसरी व चौथी (सकाळी ८ ते ९.३०)गणित - (सर्व माध्यम) ५ एप्रिल-पाचवी आणि सहावी (सकाळी ८ ते ९.४५)इंग्रजी -६ एप्रिल-सातवी आणि आठवी (सकाळी ८ ते १०)तालुकानिहाय तिसरी ते आठवीची विद्यार्थी संख्याअमरावती ४५८४,अचलपूर ५४६८,अंजनगाव सुजी २५५५,भातकुली ३८०८,चांदूर बाजार ४०९९,चांदूर रेल्वे ३८३५,चिखलदरा १०१४७,दर्यापूर १२३१७,धामनगांव रेल्वे ३४८०,धारणी १५०६८,मोर्शी ५०८६,तिवसा ३२०४,वरूड ६०४४,महापालिका १०२३० एकूण ९४७३१विद्यार्थी ही चाचणी देणार आहेत.