शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान, 48 उमेदवारांचे भाग्य सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद्रे निश्चित करण्यात आले होते. भातकुली, तिवसा, चिखलदरा, मोर्शी, चांदूररेल्वे तालुक्यात १०० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत १७ संचालक पदांच्या निवडीसाठी ४८ उमेदवारांचे भाग्य सोमवारी मतपेटीत सील झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत एकूण १,६८७ पैकी १,५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९४ टक्के मतदान झाले. मतमोजणी मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह ग्रामीण मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत दिसून आली. २३ सप्टेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरूवात झाली होती. सोमवारी मतदान आटोपताच उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद्रे निश्चित करण्यात आले होते. भातकुली, तिवसा, चिखलदरा, मोर्शी, चांदूररेल्वे तालुक्यात १०० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ८३ टक्के मतदान झाले आहे. १०० टक्के मतदान झालेल्या तालुक्यात कुणाला लॉटरी लागते, हे मंगळवारी सायंकाळपर्यंतच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. 

सेवा सहकारी सोसायटीच्या निकालावर सत्तेचे गणितजिल्ह्यात १४ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. त्यापैकी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धारणी व वरूड अशा चार सेवा सहकारी साेसायट्यांतून संचालक अविरोध निवडून आले आहेत. सोमवारी १० सेवा सहकारी सोसायट्यांमधून संचालकपदाच्या निवडीसाठी मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर कुणाची सत्ता आरूढ होईल, हे सेवा सहकारी सोसायटीच्या निकालावर अवंलबून राहणार आहे. ज्यांच्या ताब्यात सोसायटी, तेच बॅंकेवर अधिराज्य गाजवतील, असे निकालाच्या पूर्वसंध्येला चित्र दिसून आले. 

उमेदवारांची धडधड वाढली१७ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, कौल कुणाला, हे मंगळवारी मतमाेजणीअंती स्पष्ट होईल. ओबीसी, व्हीजेएनटी, एससी/एसटी, महिला, नागरी बॅंक, वैयक्तिक अशा प्रवर्गातून कोणत्या केंद्रातून किती मते मिळतील, याचे गणित जुळविताना उमेदवारांमध्ये विजयाचा विश्वास दिसून येत नव्हता.

गाडगेबाबा सभागृहात मतमोजणीगाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. त्याकरिता जिल्हा उपनिबंधक प्रशासनाने आठ टेबलची व्यवस्था केली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

मतदान नसलेले राजकुमार पटेल एकमेव उमेदवारजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोमवारी मतदान घेण्यात आले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे एकमेव मतदान न केलेले उमेदवार ठरले आहेत. धारणी तालुक्यातील साद्रावाडी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे ते संचालक असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. परंतु, ते  मतदार नव्हते. त्यामुळे मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. 

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

अचलपूर  ८३, भातकुली १००, नांदगाव खंडेश्वर ९५, चांदूररेल्वे ९८, तिवसा १००, वरुड १००, धारणी ९६, चिखलदरा १००, दर्यापूर ८८, धामणगाव रेल्वे ९७, चांदूरबाजार ९३, अंजनगाव सुर्जी ९२ टक्के तर अमरावती तालुक्यातही ९६ टक्के मतदान झाले आहे.

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक