शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

जिल्ह्यात तीन दिवसांनी ९०० रेमडिसिव्हिर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

कोरोना रुग्णांवर गुणकारी असलेले रेमडिसिव्हिरची सध्या मोठी मागणी असताना, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चार दिवसांपूर्वी ३०० रेमडिसिव्हिर उपलब्ध झाले व एका  दिवसांत संपले होते. जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून उसनवार पद्धतीने पीडीएमएमएसीसह शहरातील कोविड रुग्णालयांना ४०० रेमडिसिव्हिर उपलब्ध केले होते व डॉक्टरांच्या विहित फाॅर्मवर ते उपलब्ध करण्यात येत होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात दरदिवशी दोन ते अडीच हजार इंजेक्शनची गरज, पुन्हा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांपासून तुटवडा असलेले रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे ९०० व्हायल गुरुवारी जिल्ह्यास उपलब्ध झाले व ते सर्व कोविड रुग्णालयांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्याची मागणी दोन ते अडीच हजार रेमडिसिव्हिरची असल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झालेली आहे.कोरोना रुग्णांवर गुणकारी असलेले रेमडिसिव्हिरची सध्या मोठी मागणी असताना, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चार दिवसांपूर्वी ३०० रेमडिसिव्हिर उपलब्ध झाले व एका  दिवसांत संपले होते. जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून उसनवार पद्धतीने पीडीएमएमएसीसह शहरातील कोविड रुग्णालयांना ४०० रेमडिसिव्हिर उपलब्ध केले होते व डॉक्टरांच्या विहित फाॅर्मवर ते उपलब्ध करण्यात येत होते. यासाठी मोठी रांग सकाळपासून असल्याचे दिसून आले.

अन्य जिल्ह्यातील रुग्ण दाखल झाल्याने वाढली मागणीसीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर ताण आला व रुग्ण अमरावती जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. त्यामुळे रेमडिसिव्हिरची मागणी वाढली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यासाठी अधिक मागणी नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डेपोकडे ३० लाख ॲडव्हांस जमारेमडिसिव्हिरसाठी विविध कंपनीच्या नागपूर येथील डेपोत जिल्ह्यातील स्टॉकिस्टने ३० लाखांवर आगाऊ रक्कम जमा केलेली आहे. यासाठी बहुतेक  मेडीकल दुकानदारांनी एक ते दीड लाखांपर्यंतची रक्कम दिल्याची माहिती एफडीएद्वारा देण्यात आली. मात्र, मागणी इतका पुरवठा अद्यापही झालेला नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस