शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शहरात ९० टक्के गणपती प्लास्टर आॅफ पॅरिसचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:05 IST

पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अमरावती शहरात आजही ९० टक्के प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचीच स्थापना होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणपूरक गणेशाकडे नागरिकांचा ओढा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनजागृतीचा अभाव असल्यामुळे अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बंदीची अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : स्थानिक स्वराज्य संस्थाच पर्यावरणाविषयी गंभीर नाहीत

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अमरावती शहरात आजही ९० टक्के प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचीच स्थापना होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणपूरक गणेशाकडे नागरिकांचा ओढा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनजागृतीचा अभाव असल्यामुळे अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बंदीची अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.घराघरांत विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना असल्यामुळे भाविकसुद्धा जय्यत तयारीला लागले आहेत. अमरावती शहरात छोटे-मोठे असे एकूण दोनशेंवर गणेश मूर्तिकार आहेत. सद्यस्थितीत सर्व मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहे. महिन्याभरापूर्वी गणेशमूर्तींचे बूकिंग अनेकांनी केले आहे. मात्र, पर्यावरणपूरक गणेश स्थापनेचा विचारसुद्धा अनेकांनी केला नाही. गणेशमूर्तींचे बूकिंग करताना माती किंवा पीओपीबाबत बहुतांश नागरिक विचारतदेखील नसल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकारांसह छोट्या-मोठ्या मूर्तींचे व्यावसायिकसुद्धा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याला विशेष महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने याविषयी कोणतीही पूर्वसूचना किंवा माहितीसुद्धा दिली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मातीचे गणपती तयार करण्यासाठी विलंब लागतो. त्या मूर्तींची फिनिशिंग योग्य येत नाही. ती मूर्ती सुबक होत नाही. मजबूत राहत नाही. रंग योग्य लागत नाहीत आदी कारणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवात बाधा करीत आहे. शहरात गणेशमूर्तींसोबतच महालक्ष्मी, लक्ष्मी, दुर्गादेवी, पूजन, बैल आदी विविध प्रकार पीओपीनेच बनविले जात आहेत. शहरातील मूर्तिकाराजवळील १०० रुपये ते ५० हजारांपर्यंतच्या मुर्त्या आहेत. पीओपीची मूर्ती स्वस्तात, तर मातीची मूर्ती महाग दरात विक्री केली जात आहे.पीओपीवर बंदी असताना नियम व कायद्याची अमंलबजावणी केली जात नाही. त्याबाबत स्थानिक स्वराज्य सस्थांंनी जनजागृती करून मूर्तिकारांना नोटीस बजावून पीओपीची मूर्ती तयारच करू नये, असे सांगायला हवे.- नंदकिशोर गांधीपर्यावरणतज्ज्ञमातीच्या मूर्ती बनविण्यास विलंब लागतो. मेहनत खूप आहे. त्या मूर्ती तुटण्याची भीती अधिक असते. त्यामुळे ९० टक्के मूर्ती पीओपीनेच बनविल्या जाते. पीओपीवर न वापरण्याबाबत आमच्यापर्यंत माहिती कोणीही दिली नाही.- गजानन सोनसळेमूर्तिकार, अंबागेट