शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 20:19 IST

नोंदणीकृत संस्थांनी पाच वर्षे उलटूनही आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलाचे अर्ज सादर न केल्यामुळे विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द  करण्यात आली आहे.

अमरावती : नोंदणीकृत संस्थांनी पाच वर्षे उलटूनही आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलाचे अर्ज सादर न केल्यामुळे विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द  करण्यात आली आहे. सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.      धर्मादाय संस्था स्थापन करण्यापूर्वी संबंधितांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. विभागात अंदाजे लाखांवर संस्था नोंदणीकृत असून, आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत यापैकी ९ हजार २१० संस्थांच्या नोंदणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्या संस्थांनी नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलासंदर्भात अर्ज दाखल केले नाहीत, अशा संस्था अवसायनात निघाल्या आहेत. एकदा संस्थेची नोंदणी झाल्यानंतर अनेकांचे  कामकाज बंद स्थितीत, तर काही संस्था केवळ नावापुरत्याच असल्याचे निदर्शनास आले आहे. शासननिर्णयानुसार अशा सर्व संस्थांची पडताळणी करण्याचे आदेश सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यानुसार अमरावती विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त व धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात संस्थांविषयी कामकाज सुरू होते. संस्थांची मान्यता रद्द केल्याचा अहवाल मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला  आहे. बॉक्सरद्द झालेल्या संस्थांची आकडेवारीअमरावती - ५३८४अकोला - १४६०बुलडाणा - २०वाशिम - १३८४यवतमाळ - ९६२बॉक्सअमरावतीतील सर्वाधिक  संस्थांची नोंदणी रद्दअमरावती जिल्ह्यात सुमारे २५ हजार संस्था नोंदणीकृत असून, त्यामध्ये शिक्षण संस्था, वाचनालय, व्यायाम मंडळ, महिला मंडळ, बचतगटांसह काही संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची पडताळणी केल्यानंतर १७ हजार संस्थांची नोंदणी रद्द केली जाणार होती. दरम्यानच्या कालावधीत काही संस्थांनी वेळेवर आॅडिट रिपोर्ट व संस्था बदलासंदर्भात अर्ज सादर केल्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.  अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ३८४ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, विभागात ही संख्या सर्वाधिक आहे.