शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प डीपीआरसाठी ९ आॅक्टोबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:39 IST

बहुप्रतिक्षित आणि महापालिकेसाठी अनिवार्य असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा ...

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन : पाच सदस्यीय समिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतिक्षित आणि महापालिकेसाठी अनिवार्य असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्यासाठी आयुक्तांनी ९ आॅक्टोबरची 'डेडलाईन' अधिनस्थ यंत्रणेला दिली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि स्वच्छ भारत अभियानात गुणांकन मिळविण्यासह अमरावतीकर व सुकळीवासीयांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी महापालिकेला बंधनकारक आहे. महेश देशमुख यांच्याएवजी या प्रकल्पाचे आव्हान आता वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांना पेलायचे आहे.त्यापार्श्वभूमिवर प्रकल्प उभारणीसाठी आयुक्त हेमंत पवार यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. कोअर प्रोजेक्टने प्रकल्प उभारणीतून माघार घेतल्यानंतर आयुक्त हतबल झाले होते.मात्र आता सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी त्यांना सहकार्याचे बळ दिल्याने या प्रकल्पाचा प्रवास नव्याने सुरू झाला आहे. यासाठी आधी डीपीआर बनविणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने शहरातील घनकचरा संकलन, वर्गीकरण व व्यवस्थापन यासंदर्भात विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. डीपीआर बनविण्यासाठी राज्यशासनाने ज्या कन्सल्टंसीची नेमणूक केली आहे. त्या कन्सल्टंसीच्या माध्यमातून डीपीआर तयार करून घेण्याची जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे हे समितीप्रमुख आहेत. या समितीने कन्सल्टंटद्वारे डीपीआर शक्य तितक्या लवकर तयात करुन किमान ९ आॅक्टोबरपर्यंत आपल्याकडे सादर करावा,असे आदेश आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी ११ सप्टेंबरला जारी केले आहेत.वैद्यकीय आरोग्य अधिकारी सदस्य सचिवया प्रकल्पाची धुरा नव्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे सोपविली आहे. डीपीआर तयार करून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत नेमण्यात आलेल्या समितीच्या त्या सदस्य सचिव आहेत. त्यांच्याशिवाय या समितीत प्रभारी उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे व महेश देशमुख आणि सहायक वैद्यकीय आरोम्य अधिकारी अजय जाधव हे सदस्य आहेत.