शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

शिवपरिवारातील ८९९ सदस्यांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:46 IST

शिक्षणक्षेत्रात राज्यात अग्रणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी गुरूवारी १,०३८ पैकी ८९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्देकार्यकारी मंडळ निवडणूक : ८६.६० टक्के मतदान, उशिरा रात्री मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षणक्षेत्रात राज्यात अग्रणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी गुरूवारी १,०३८ पैकी ८९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ८६.६० इतकी आहे. एकूण ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अनेक कारणांनी बहुचर्चित ठरलेल्या निवडणुकीचे मतदान खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सत्तरी ओलांडलेल्या सभासदांनी देखील मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतला, हे येथे उल्लेखनीय.गुरूवारी सकाळी ८ ते सांयकाळी ५ दरम्यान श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील पाच मतदानकेंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच शिवपरिवारातील स्रेहीजन व रिंगणातील चारही पॅनेलशी संबंधित उमेदवारांच्या चाहत्यांच्या गर्दीने पंचवटी चौक फुलला होता. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी चारही पॅनेलसह अपक्ष उमेदवारांनी नियोजन केल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. अनेक वयोवृद्ध त्यांच्या नातवंडांसह उत्साहाने मतदानाला आले होते. संस्थेत एकूण १,०३६ आजीवन सभासद आहेत. यापैकी ९० सभासद हे कंपनीचे प्रतिनिधी आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत २५७ तर दुपारी एक वाजता ५६०, तीन वाजता ८०५ तर ५ वाजेपर्यंत ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या गोळ्या केल्यानंतर रात्री ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. उशिरा रात्रीपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहिल. सर्वप्रथम चार सदस्यपदांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. वृत्तलिहेस्तोवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.सी पाठक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सी.व्ही देव व निवडणूक कक्ष अधिकारी म्हणून संस्थेचे अधीक्षक दिनेश बागुल यांनी काम पाहिले.रात्री ११ नंतर येणार पहिला निकालगुरूवारी रात्री ८ नंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यावेळी प्रथम पेट्यामधील मतपत्रिका एकत्र करून सदस्य, उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष व अध्यक्ष याक्रमाने ५० चा गठ्ठा तयार करण्यात येणार आहे . ५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. व याच क्रमाने ही मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे .त्यानुसार रात्री ११ नंतर पहिला सदस्यपदासाठींचा निकाल बाहेर येणार असल्याचे निवडणूक अधिकाºयांनी सांगितले.प्रथमच तरूणाईचा उत्साहयावेळी निवडणूक रिंगणातील चार पॅनेलमध्ये बºयाच तरूणांना संधी दिली गेली. त्यामुळे त्यांचे सहकारी व स्रेहीजनांचा उस्फूर्त उत्साह यावेळी शिवपरिवाराने अनुभवला .अगदी सहजगत्या कोणतेही काम करण्याची त्यांच्या सहजप्रवृतीबाबत कौतुकाचे उद्गार यावेळी ऐकावयास मिळाले.मतदान केंद्रापर्यंत वाहनाची मुभाशिवपरिवारातील अनेक जेष्ठ सभासदांनी सत्तरी पार केली आहे. यापैकी काहींची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णवाहिक ा अन्य वाहनांद्वारे मतदान केंद्रांपर्यत जाण्याची मुभा होती. व त्यांना मतदान करण्यास त्यांच्या निकटतम नातेवाईकांचे सहकार्य घेण्यास परवानगी असल्यामुळे नातवंडासह येऊन अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.अमरावती, अकोलेकरांची अधिक गर्दीशिवपरिवारातील आजीवन सभासद राज्यात विखुरले असले तरी अमरावती व अकोला जिल्ह्यात अधिक आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील चाहत्यांची मोठी गर्दी होती. अधिकाधिक सभासद चारचाकी वाहनांनी आल्यामुळे शेकडो वाहनांची देखील गर्दी होती. भाऊसाहेबांवर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याने यावेळी कौल कुणाला ? हे जाणून घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून शिवपरिवाराचे चाहते आले आहेत.सर्वच बुथ आमनेसामनेया निवडणुकीसाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वच पॅनेलद्वारा बुथ लावण्यात आले. या ठिकाणी अपक्षांसह सर्वच पॅनेलचे हितचिंतक, आप्तस्वकीय व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहून परस्परांशी हास्यविनोद करीत होते.