शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सात तालुक्यांत ८७ किलोमीटरचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:02 IST

जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्तीसाठीही ४.८० कोटी रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य त्यासाठी घेतले जाणार आहे.

ठळक मुद्दे७२ कोटी बांधकाम खर्च : ग्रामविकास विभागाची प्रशासकीय मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्तीसाठीही ४.८० कोटी रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य त्यासाठी घेतले जाणार आहे.मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रत्येक रस्त्यासाठी तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहिल.सदर रस्त्यांसाठी लागणारी जमिन ग्रामविकास विभागाच्या ताब्यात आहे, याची धातरजमा करण्यात यावी. खासगी जमिन अथवा वनविभागाची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे हाती घेऊ नयेत, असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.दर्यापूर तालुक्यात ८ कोटी रुपयेदर्यापूर तालुक्यातील सहा रस्त्यांना मान्यता दिली. यात नांदरुण ते भामोद रस्त्यासाठी २.०८ कोटी रुपये, गोडेगाव रस्त्यासाठी ६४.६१ लाख रुपये, बोराळा आराळा रस्त्यासाठी १.७३ कोटी रुपये, येवदा कातरखेडा तेलखेडा या २.१० किमी रस्त्यासाठी १.७६ कोटी रुपयेल माहूली धांडे रस्त्यासाठी १.७५ कोटी रुपये, राज्यमहामार्ग २७८ ते नालवाडा रस्त्यासाठी ८८.९४ लाख रुपये मंजूर केलेत. मोचर्डा रस्त्यासाठी ७३.०९ लाख रुपये, व राज्यमहामार्ग २७८ ते बेंब्या खुर्द रस्तानिर्मितीसाठी ७८.५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यात २.१४ कोटींतून रस्तेअंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी रत्नापुर या ५.७० किमी लांबीच्या रस्ताबांधकामासाठी ७.४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ४९.६३ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पांढरी ते खोडगाव रस्त्यासाठी १.३० कोटी, शेलगाव रस्त्यासाठी १.४० कोटी रुपये व सर्फापूर रस्त्यासाठी २.१४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.चांदूरबाजार तालुक्यात ११ किमीचे रस्तेचांदूरबाजार तालुक्यातील लाखनवाडी ते करजगाव रस्त्यासाठी २.१४ कोटी, आखतवाडा ते शिरजगाव बंड रस्तानिर्मितीसाठी १.४७ कोटी रुपये, तीन किमीच्या बेसखेडा रस्त्यासाठी २.२६ कोटी रुपये, जसापूर ते कोदोरी रस्त्यासाठी २.४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या चार रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.चिखलदारा तालुक्यात पाच रस्तेचिखलदरा तालुक्यातील पाच रस्त्यांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. त्यात १.५९ किमीच्या बुटिदा रस्त्यासाठी १.२४ कोटी, चुर्णीढाण्या पलस्या रस्त्यासाठी २.०२ कोटी रुपये, काटकुंभ ते रजनीकुंड या २.५५ किमीच्या रस्त्यासाठी १,७३ कोटी रुपये, चुर्णी ते कारदा साठी ४.२३ कोटी रुपये, भंडोरा रस्त्यासाठी २.३८ कोटी रुपये खर्च येईल.मोर्शी तालुक्यात पाच रस्तेमोर्शी तालुक्यात ५२.७९ लाख रुपये खर्च करुन दुर्गवाडा रस्ता, कोळविहीर ते ब्राम्हणवाडा ते बहिरम रस्त्यासाठी ३.६७ कोटी रुपये, मायवाडी १.१४ कोटी, रिध्दपूर ते दाभेरी ब्राम्हणवाडा रस्त्यासाठी ३.५५ कोटी, व १.८६ किमी लांबीच्या मोळवणसाठी १.६७ कोटी रुपये खर्च केले.नांदगाव तालुक्यात तीन रस्तेनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर- शिवरा रस्त्यासाठी ४.४३ कोटी रुपये, ढवलसरी -चांदसुरा रस्त्यासाठी २.७३ कोटी रुपये, सुलतानपूर ते नविन बेलोरा रस्त्यासाठी १.७६ कोटी रुपये खर्च येणार आहे.तिवसा तालुक्यात चार रस्तेग्रामविकास विभागाने तिवसा तालुक्यातील चार रस्त्यांना मान्यता देण्यात आली. यात ३ किमीचा शेंदूरजना-डेहणी-निंभोरा भारसवाडी रस्त्यासाठी २.२६ कोटी रुपये, वरुडा ते दापोरी राजुरवाडी या रस्त्यासाठी ४.३० कोटी रुपये, भांबोरा ते पालवाडी रस्ता बांधकामासाठी २.८१ कोटी रुपये व विरगव्हान जोडरस्त्यासाठी ७७.६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामांना लवकरच प्रारंभ होईल.