शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात खासगी भागीदारीतून ८६० घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:24 IST

सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते.

ठळक मुद्देआर्थिक दुर्बल घटकांना लाभ : दुर्बल घटकातील १९,५२९ नागरिकांचे आॅनलाईन अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ६८७ लाभार्थ्यांकडून डीडीच्या स्वरूपात प्रती ४९ हजारांची अमानत रक्कम महापालिकेद्वारा जमा करण्यात आलेली आहे.गृहनिर्माण विभागाच्या निर्देशाप्रमाणे ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेत चार घटक अंतर्भूत केलेले आहे. यात शहरी भागाकरिता महापालिका ही अंमलबजावणी यंत्रणा आहे. यामध्ये चार घटकांत २०२१-२२ दरम्यान २४ हजार ८१० घरकुलांची निर्मिती केली जाईल. यात घटक क्रमांक तीनमध्ये खासगी भागीदारीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ८६० घरकुलांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्याने तीन दिवसांपूर्वीच या योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. या घटकांतर्गत लाभार्थ्यांना शासनाचे अडीच लाखांचे अनुदान व ३० चौरस मीटर चटईक्षेत्र राहील. महापालिका हद्दीत बडनेरा, बेलोरा, निंबोरा, नवसारी तारखेडा, म्हसला व रहाटगाव येथील भूखंडाची निवड झालेली आहे.या घटकात सदनिकेची किंमत नऊ लाखांपर्यंत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना सहा लाखांचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी महापालिकेद्वारा बँकांशी समन्वय साधला जात आहे व या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून विकासकासोबत १२ डिसेंबरला करारनामा करण्यात आल्याची माहिती उपअभियंता सुनील चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. या आठवड्यात भूमीपूजन झालेल्या ८६० घरकुलांचे बांधकाम आॅक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.