शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'अ‍ॅलेक्स'साठी बनविला ८५ हजारांचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:47 IST

महिनाभरापूर्वी वेलकम पॉइंट येथे बेवारस आणि जखमी स्थितीत आढळलेल्या घोड्यावर वैद्यकीय उपचार करून प्राणिपे्रंमीने ८५ हजारांचा निवारा दिला. सायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठीचे दातृत्व कौतुकास्पद असून, त्यांनी मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन दिल्याने ही बाब प्रेरणादायी ठरत आहे.

ठळक मुद्देसायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठी दातृत्व : मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी वेलकम पॉइंट येथे बेवारस आणि जखमी स्थितीत आढळलेल्या घोड्यावर वैद्यकीय उपचार करून प्राणिपे्रंमीने ८५ हजारांचा निवारा दिला. सायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठीचे दातृत्व कौतुकास्पद असून, त्यांनी मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन दिल्याने ही बाब प्रेरणादायी ठरत आहे.वसाचे सर्पमित्र मुकेश वाघमारे आणि अनिकेत सरोदे यांनी बेवारस घोड्याबाबत संस्थेला अवगत केले. त्यानंतर वसाचे निखिल फुटाणे, रोहित रेवाळकर, प्रशिक समदुरे, अनिकेत सरोदे, यश साबळे, वाहनचालक रोशन आवारे, गणेश अकर्ते व शुभम सायंके यांनी घोड्याला पकडले. महिनाभर उपचार केल्यानंतर त्याच्या विशेष काळजीसाठी त्याला वसा रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बेवारस आणि पायाने पंगू असलेल्या घोड्याला वसाचे शुभम सायंके यांनी ‘अ‍ॅलेक्स’ नाव दिले. याची संपूर्ण व्यवस्था व्हावी, याकरिता गजानन सायंके व त्यांच्या सौभाग्यवती वनिता सायंके यांनी वेगळे ८५ हजारांचे घर विकत घेतले. ते घर वसा संस्थेच्या अध्यक्षांना भेटस्वरूपात दिले. गजानन सायंके हे पेशाने प्राथमिक शाळेवर सहायक शिक्षक असून, त्यांची पत्नी उत्तमसरा ग्रामपंचायतच्या सदस्या आहेत. त्याचप्रमाणे अ‍ॅलेक्सच्या जेवणाची जबाबदारी गावातील शेतकरी धम्मानंद राऊत यांनी स्वीकारली आहे. अ‍ॅलेक्सचा पाय पूर्णपणे बरा व्हायला दीर्घकाळ लागणार असल्याचे पशु शल्यचिकित्सक अनिल कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर अ‍ॅलेक्सचे पूर्ण जीवन सुखात व आरामात जावे, याकरिता वसाचे भूषण सायंके, पंकज मालवे, मंगेश सायंके, राहुल सुखदेवे, निखिल फुटाणे आणि गणेश अकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.