मुख्यमंत्री सकारात्मक : एअरपोर्ट आॅथरिटीच्या अहवालावर निर्णयअमरावती: येथील बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांच्या पुर्ततेसाठी ८.५० कोटी रुपयांच्या प्रस्ताव आ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक घेतले असून लवकरच निधी मंजूर होऊन विमानतळावर पायाभूत सुविधांची पुर्तता केली जाणार आहे. राज्यशासनाने आ.सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीने गतवर्षी जिल्ह्याचा दौरा केला होता. यात बेलोरा विमानतळ, गाविलगड किल्ला, चिखलदरा आदी स्थळांची पाहणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर केला होता. बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांवर भर देण्याचे या समितीने म्हटले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने मे २०१६ मध्ये बेलोरा विमानतळाची पाहणी करुन येथे विमानसेवा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणी केली होती. त्यानुसार चार सदस्यीय चमुने बेलोरा विमानतळाची पाहणी केली असताना ७२ आसनी विमान (एटीआर) सुरु करण्यास होकार दर्शविला आहे. मात्र भविष्यात बेलोरा विमानतळाहून विमान ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे राहील, असे या चमुने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. गत काही महिन्यांपूर्वी बेलोरा विमानतळावर एकाच वेळी तीन छोटी विमाने उतरविण्याचे धाडस करण्यात आले आहे, हे विशेष. पहिल्या टप्प्यात बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा, नार्इंट लँडिंग, १३७५ वरुन १८५० मीटरची धावपट्टी , एटीस टॉवरची उभारणी, विमानतळाची संरक्षण भिंत उभारण्यासाठी ८.५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. छोट्या स्वरुपाची विमाने सुरु करण्यासाठी आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी ८.५० कोटी रुपये मंजूर करण्याचे निश्चित केले आहे.७२ आसनी एटीआर, नाईट लॅडिंगची सोयलवकरच बेलोरा विमानतळावर ७२ आसनी विमानसेवा, नाईट लँडिंगसह विविध विकास कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी दिली. बेलोरा विमानतळावर हल्ली १३७५ मिटर धावपट्टी असून प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी किमान १८५० मिटर धावपट्टी तयार केली जाणार आहे. विमानतळाची संरक्षण भिंत निर्माण करण्याचे प्राधान्याने ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाच्या विकासासाठी सकारात्मक असल्यामुळे लवकरच विमान सेवा सुरु होईल, असे संकेत आ. सुनील देशमुख यांनी दिले आहे.‘‘ बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरु करण्यास काहीही हरकत नाही. तसा हवाला यापूर्वी एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने राज्य शासनाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी ८.५० कोटी रुपये निधी देण्यास होकार दिला आहे.सुनील देशमुखआमदार, अमरावती.
बेलोरा विमानतळाच्या पायाभूत सुविधांसाठी ८.५० कोटी
By admin | Updated: July 25, 2016 00:02 IST