आयुक्तांची माहिती : नवीन सात जलकुंभअमरावती : केंद्र शासनाने अमृत योजनेतून अमरावती शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नवीन सात जलकुंभ तसेच १७ विस्तारीत गावांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले जाईल, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले.महानगराची वाढती लोकसंख्या बघता पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अमृत योजनेतून पूल संरक्षण भिंत उभारणे, शहर बस, भुयारी गटार योजना व पाणी पुरवठ्याची कामे करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, अमृत योजनेत शासनाने पाणी पुरवठा व रखडलेल्या भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर केल्याचे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले. निधी मंजुरीचा प्रस्ताव बारगळलाअमरावती : नाले डीपीआर तयार करुन संरक्षण भिंत उभारणे आणि नव्याने भुयारी गटार योजनेची कामे सुरु करण्यासाठी निधी मंजुरीचा प्रस्ताव तूर्तास बारगळल्याचे गुडेवार म्हणाले. नवीन व जुन्या शहराची मागणी लक्षात घेता सात जलकुंभ निर्माण केले जाईल. विस्तारित १७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यासाठी ८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील फेज ५ चे कामे पूर्ण करण्यासाठी ४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतरच सन २०१६- १७ मध्ये भुयारी गटार योजनेसाठी ३९० कोटी रुपये मंजूर केले जातील, असे आयुक्त गुडेवारांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात भुयारी गटार योजनेसाठी ११७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असताना ही योजना पूर्णत्वास गेली नाही, याविषयी शासनाने बोट ठेवले आहे. अमृत योजनेतून स्टार बस, नाले संरक्षण भिंत साकारण्याचा डीपीआर तूर्तास बारगळला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
अमृत योजनेतून शहरासाठी ८५ कोटी मंजूर
By admin | Updated: December 19, 2015 00:03 IST