शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉन रुग्णांसाठी 85 बेड; प्रशासनात अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:01 IST

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर जास्त असल्यामुळे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर नमुने घेतले जात आहेत व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी काही निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. याशिवाय एकही ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद नाही. तरीही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सीमेवर ओमायक्रॉन धडकल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णासाठी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील चौथ्या माळ्यावर ९५ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय पुरेसा औषध साठादेखील उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर जास्त असल्यामुळे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर नमुने घेतले जात आहेत व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी काही निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. याशिवाय एकही ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद नाही. तरीही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसताना जिल्हा व मनपा प्रशासनाची यंत्रणा गपगार आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण पाय पसरण्याची शक्यता आहे.  आरोग्य यंत्रणेचा सर्व जोर सध्या लसीकरणावर आहे. जिल्ह्यात साधारणपणे ८० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणासाठी मोहीम व अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये रोज २०च्या वर शिबिरे घेण्यात येत आहेत. याद्वारे मोहीम गतिमान करण्यात आली आहे.

शहरात १०, ग्रामीणमध्ये एक पॉझिटिव्ह कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. चार महिन्यांत संक्रमितांच्या दुहेरी संख्येची नोंद नाही. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १० व ग्रामीण भागामध्ये फक्त एक सक्रिय रुग्ण आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्हच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण उच्चांकी ९८.३३ टक्के आहे.

आरोग्य यंत्रणा अलर्टओमायक्राॅनच्या रुग्णांसाठी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील चौथ्या माळ्यावर ८५ बेड तयार आहेत. याशिवाय औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा साठाही पुरेसा आहे. आरोग्य विभागाद्वारे सर्व खबरदारी घेतली जात आहे.- डॉ. श्यामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या